नवी दिल्ली : भारतात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, देशातील एक मोठा वर्ग आजही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये (Post Office Scheme), भारतीय जीवन विमा महामंडळाच्या (Life Insurance Corporation) योजनांमध्ये गुंतवणूक करतात. एलआयसी ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे. या कंपनीकडे देशातील कोट्यवधी नागरिकांच्या पॉलिसी आहेत. वाढत्या शैक्षणिक खर्चाने (Education Cost) सर्वच पालक हैराण झाले आहेत. भविष्यातील खर्चाचे आकडे त्यांना घाबरवत आहेत. अशावेळी एलआयसीच्या या प्लॅनमधील गुंतवणूक त्यांना फायदेशीर ठरु शकते.
LIC Jeevan Tarun Policy
एलआयसी देशातील प्रत्येक वर्गासाठी काही ना काही योजना घेऊन आली आहे. एलआयसीने खास मुलांसाठी योजना (LIC Policy for Children) आणली आहे. मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी एलआयसीने एक योजना आणली आहे. त्यामुळे मुलांच्या भविष्यातील शैक्षणिक खर्च पेलावता येईल. एलआयसी जीवन तरुण पॉलिसी (LIC Jeevan Tarun Policy) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेतील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळतो.
किती असावे मुलांचे वय
एलआयसीची जीवन तरुण पॉलिसीत गुंतवणूक करण्यासाठी मुलांचे वय कमीत कमी 3 महिने आणि जास्तीत जास्त 12 वर्षे असावे. या योजनेत मुलं 20 वर्षांची होईपर्यंत गुंतवणूक करता येते. त्यानंतर पुढील पाच वर्षांपर्यंत कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही. मुलांचे वय 25 वर्षे झाल्यानंतर पूर्ण रक्कमेवर दावा करता येतो. त्यामुळे मुलांचे शिक्षण आणि लग्नाचा मोठा खर्च कमी होतो.
कमीत कमी किती फायदा
या पॉलिसीत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 75,000 रुपयांची सम एश्योर्ड लाभ मिळेल. तर जास्तीत जास्त किती रक्कम मिळेल, याची मर्यादा निश्चित नाही. या योजनेत तुम्ही मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर हप्ता जमा करु शकता. जीवन तरुण पॉलिसी एक पार्टिसिपेटिंग लिमिटेड पेमेंट देणारी योजना आहे.
मॅच्युरिटी रक्कम किती
या पॉलिसी अंतर्गत 12 वर्ष वयाच्या मुलांपर्यंत ही गुंतवणूक करता येते. प्रत्येक दिवशी 150 रुपयांची छोटी बचत केल्यास वार्षिक जवळपास 54,000 रुपयांचा प्रीमियम जमा होईल. पुढील 8 वर्षांत एकूण 4.32 लाख रुपये जमा करण्यात आले. त्यावर 2.47 लाख रुपयांचा बोनस मिळेल. 25 व्या वर्षी तुमचा मुलगा जवळपास 7 लाख रुपयांचा मालक असेल.
एलआयसी ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे. वेळोवेळी एलआयसी प्रत्येक वर्गासाठी योजना आणते. या योजनेतून गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होतो. त्यामुळे एलआयसीच्या योजनेवर अजून गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. एलआयसी योजनाचा सर्वात चांगला फायदा म्हणजे, बचतीसह गुंतवणूकदाराला विम्याचे संरक्षणही मिळते. त्याला मॅच्युरिटी कालावधीनंतर सर्व फायदे तर मिळतातच, पण पुढे पाच ते दहा वर्ष विम्याचे संरक्षण सुरुच राहते.