नवी दिल्ली : सोने अथवा सोन्याची दागिने खरेदी करताना हॉलमार्किंग (Gold Hallmarking ) तपासूनच खरेदी करा. त्यामुळे खऱ्या आणि खोट्या सोन्याची पारख होईल. सोने खरेदी करताना ते कमीत कमी 22 कॅरेट शुद्धतेचे असणे आवश्यक आहे. देशात आता सोने आणि दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. अस्सल सोन्याची ओळख पटविण्यासाठी हॉलमार्किंगचे बंधन घालण्यात आले आहे. भारतीय मानक ब्युरोचे (BIS) हे दर्जेदार सोने असल्याचे प्रमाणपत्र आहे .हे प्रमाणपत्र त्याच्या शुद्धतेची हमी देते. भारतात जून 2021 पासून सोन्याची आभुषणे, दागिने यावर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे.
अनेकदा सराफा दुकानदार, विना हॉलमार्किंगचे सोने विक्री करतात. त्याच्या गुणवत्तेची, दर्जाची आणि शुद्धतेची कोणतीच हमी नसते. त्यामुळे तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासता यायला हवी. त्यामुळे तुम्हाला खऱ्या आणि खोट्या, अस्सल आणि नकली सोन्याची पारख करता येईल. त्यासाठी सोन्याची शुद्धता तुम्हाला तपासता यायला हवी.
ही आहे खऱ्या सोन्याची ओळख
जेव्हा तुम्ही सोने अथवा त्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. तेव्हा त्यावरील BIS हे चिन्ह जरुर तपासा. हे चिन्ह एका त्रिकोणासारखे दर्शविल्या जाते. तुमच्या दागिन्याच्या बिलावर हॉलमार्किंगचे मूल्य, किंमत जरुर तपासा. त्यानुसार, तुम्हाला किती कॅरेटचे सोने मिळाले. तुम्ही खरेदी केलेले सोने किती शुद्धतेचे आहे, हे समोर येईल. सोन्याच्या घडवणीसाठी आणि शुद्धतेसाठी तु्म्ही किती रुपये मोजले हे तुमच्या लक्षात येईल. सोने खरेदी करताना ते कमीत कमी 22 कॅरेट शुद्धतेचे असणे आवश्यक आहे. देशात आता सोने आणि दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे.
हेच सोने का खरेदी करावे
सोन्याची हॉलमार्किंग त्याच्या शुद्धतेची हमी देते. त्यामुळे तुम्हाला खरे आणि खोटे सोने याच्यातील फरक, तफावत लक्षात येते. देशात सोन्याच्या शुद्धतेसाठी आता हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे दागिने, आभुषणे तयार करण्यासाठी आता 22 कॅरेट सोन्याचा वापर, उपयोग करणे आवश्यक आहे. हे सोने 91.6 टक्के शुद्ध असते. त्यामुळे तुमची फसवणूक होत नाही.
असे चेक करा हॉलमार्किंग