नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही भारतातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी आहे. एलआयसीवर भारतीय नागरिकांचा आजही मोठा विश्वास आहे. विमा काढायचा म्हणजे, एलआयसीच, असा सर्वांचा हेका असतो. एलआयसी अनेक प्रकारच्या विमा योजना चालविते. या विमा योजनांमध्ये बचतीसह (Saving) विम्याचे संरक्षण देण्यात येते. जीवन विम्यासोबत (Life Insurance) परतावा मिळत असल्याने अनेक नागरीक एलआयसी योजनांमध्ये पैसे गुंतवतात. एलआयसी सरकारी विमा कंपनी असल्याने रक्कम बुडण्याचा धोका ही नसतो. या योजनेत पॉलिसी होल्डरच्या मृत्यूनंतर कमीत कमी 2.50 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 22 लाख रुपये डेथ बेनेफिट मिळतो.
एलआयसीची धन संचय ही योजना पण लोकप्रिय आहे. ही एक नॉन लिंक्ड पार्टिसिपेटिंगक इंडिविज्यूएल सेव्हिंग प्लॅन विथ लाईफ इन्शुरन्स आहे. मॅच्युरिटीपूर्वीच या योजनेत गुंतवणूकदारांना हमीपात्र उत्पन्न मिळते. या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना जोरदार परतावा तर मिळतोच पण त्यांना जीवन विम्याचे संरक्षणही मिळते. तसेच विमाधारकाचा मृत्यू ओढावल्यास त्याच्या वारसदारांना नुकसान भरपाई मिळते.
या विमा योजनेत 5 ते 15 वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूकदाराला अजून एक फायदा मिळतो. तुम्हाला गुंतवणुकीवर कर्ज उपलब्ध होते. तर विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसांना डेथ बेनेफिट मिळतो. एकाच योजनेत अनेक फिचर्स देऊन कंपनीने ग्राहकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला आहे. ही योजना सर्वच बाजूने ग्राहकांच्या फायद्याची दिसून येते.
एलआयसी धन संचय पॉलिसीअतंर्गत अनेक खास वैशिष्ट्ये मिळतात. मृत्यूनंतर वारसांना मिळणारी नुकसान भरपाई तुम्ही एकरक्कमी अथवा पाच वर्षांत हप्त्याने घेऊ शकतात. मॅच्युरिटीत हमखास उत्पन्न आणि टर्मिनल बेनिफट मिळतो. या पॉलिसीच्या दरम्यान विमाधारकाचा मृत्यू ओढावल्यास त्याच्या वारसांना उत्पन्न मिळते. फायदा मिळतो.
एलआयसी धनसंचय पॉलिसीत गुंतवणुकीसाठी चार पर्याय मिळतात. त्यांना ए, बी, सी आणि डी अशी नावे आहेत. यामध्ये ए आणि बी या योजनेत कमीत कमी 3 लाख 30 हजार रुपये गुंतवावे लागतात. पर्याय सीमध्ये कमीत कमी 2 लाख 50 हजार रुपये आणि डी या पर्यायामध्ये 22 लाख रुपयांच्या विम्याची संधी मिळते.
या योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय 3 वर्ष आहे. तर कमाल वयाची मर्यादा ही ए, बी, सी आणि डी या पर्यायानुसार बदलते. ए, बी या पर्यायासाठी ही वयोमर्यादा 50 वर्षे आहे. तर सी हा पर्याय निवडल्यास, अधिकत्तम वयोमर्यादा 65 वर्ष आहे. तर पर्याय डी अंतर्गत ही वयोमर्यादा 40 वर्षे इतकी आहे.
धनसंचय योजनेत गुंतवणुकीसाठी 5, 10 वा 15 वर्षे अशी वर्षे आहेत. या कालावधीसाठी तुम्हाला योजनेत गुंतवणूक करता येते. जितके अधिक वर्षे तुम्ही गुंतवणूक कराल, तेवढा अधिकचा फायदा मिळतो. या पॉलिसीतंर्गत वार्षिक कमीतकमी 30 हजार रुपयांचा हप्ता जमा करावा लागेल. पॉलिसी होल्डरच्या मृत्यूनंतर कमीत कमी 2.50 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 22 लाख रुपये डेथ बेनेफिट मिळतो.