नवी दिल्ली | 5 सप्टेंबर 2023 : उतारवयात शरीर थकते आणि खर्च वाढतो. अशावेळी अगोदर केलेली गुंतवणूक तुमच्या फायद्याची ठरु शकते. तुमचा कष्टाचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा आयुष्याच्या संध्याकाळी मिळतो. काही सहकारी बँकेच्या बुडण्याच्या घटना, अनेक फसव्या गुंतवणूक योजनांपेक्षा पोस्टाची ही योजना फायदेशीर ठरते. या योजनेत गुंतवणुकीवर केंद्र सरकारची हमी तर मिळतेच पण चांगला परतावा मिळतो. ज्येष्ठ नागरीक बचत योजनेत (Senior Citizen Saving Scheme) जबरदस्त परतावा मिळतो. सध्या या योजनेवर 8.2 टक्के व्याज मिळते. या व्याजदरात केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन त्यात बदल करते. ही योजना सर्वांसाठी फायदेशीर आहे. या योजनेत दोन लाखांचे व्याज मिळू शकते. पण त्यासाठी इतकी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
उतारवयात होईल फायदा
पोस्ट ऑफिस एससीएसएस ही योजना खास करुन जेष्ठ नागरीकांसाठी आहे. ही योजना 60 वर्षांपेक्षा अधिक नागरिकांसाठी आहे. ही योजना त्या लोकांसाठी, नागरिकांसाठी आहे, ज्यांनी निवृत्ती स्वीकारली आहे. या योजनेत सध्या 8.2 टक्क्यांनी व्याज मिळत आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांनी 5 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास त्याला दर तीन महिन्याला या रक्कमेवर 10,250 रुपयांचे व्याज मिळेल. पुढील पाच वर्षांत व्याजाची रक्कम दोन लाख रुपये होईल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
या योजनेचा फायदा काय
कसे उघडाल खाते
या योजनेत कोणत्याही पोस्ट खात्यात, सरकारी वा खासगी बँकेत खाते उघडता येईल. त्यासाठी एक अर्ज भरुन जमा करावा लागेल. या अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो, ओळखपत्र आणि इतर केवायसी कागदपत्रे जोडावे लागतील. या योजनेतील व्याजाची रक्कम थेट खात्यात जमा करता येईल. दर तीन महिन्याला केंद्र सरकार व्याजाचा आढाव घेईल.