नवी दिल्ली : सुरक्षित आणि जोरदार फायद्यासाठी गुंतवणूकदार आजही पोस्ट ऑफिसच्या (Post Office) योजनांवर उड्या टाकतात. सुरक्षित आणि हमखास परताव्यासाठी तुम्ही पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या योजना तुम्हाला फायदेशीर ठरु शकतात. पोस्ट ऑफिसच्या अनेक अल्पबचत योजनांमध्ये (Small Savings Scheme) गुंतवणुकीची मर्यादा नाही. या योजनांचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला अनेक खाती उघडता येतात. या बचतीवर कर सवलतही मिळवता येईल. तसेच या योजनेवर इतर फायदे मिळतात. त्यामुळे बचतीवर व्याज मिळेल. कर सवलत मिळेल आणि जोरदार परतावा ही मिळेल.
पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना (NSC) ही अशीच एक लोकप्रिय योजना आहे. ही योजना पाच वर्षांसाठी मॅच्युअर होते. या योजनेत वार्षिक 7% व्याज मिळते. व्याजावर ही दुहेरी फायदा मिळतो. म्हणजे कम्पाऊंडिंगचा फायदा होतो. या योजनेत तुम्हाला अंशतः रक्कम काढता येत नाही. मॅच्युरिटीवर संपूर्ण रक्कम काढता येते. पोस्ट ऑफिसच्या संकेतस्थळानुसार, या योजनेत 1000 रुपये जमा केल्यास पाच वर्षानंतर 1403 रुपये मिळतील.
या योजनेचा सर्वात चांगला फायदा म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या पटीत त्यावर चक्रवाढ व्याज मिळते. 100 रुपयांपासून दीड लाखांपर्यंत ग्राहकाला या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनेत सध्या सरकार वार्षिक 7 टक्के दराने व्याज देत आहे. कम्पांऊड इंटरेस्टच्या मदतीने गुंतवणुकदाराची रक्कम कालावधी पूर्ण होण्यापूर्वी चांगलीच वाढते. या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे. गुंतवणुकदाराची इच्छा असेल तर या योजनेचा कालावधी वाढविता येतो. 5 वर्षे या योजनेत आणखी गुंतवणूक करता येते.
या योजनेत गुंतवणुकदाराला कर सवलतही (Tax Benefit) मिळते. ग्राहकाने केलेल्या एकूण गुंतवणुकीवर सरकारकडून प्राप्तिकराच्या कलम 80C अंतर्गत वजावटीचा लाभ मिळतो. दीड लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेवर गुंतवणुक करता येते. व्याजातून ग्राहकाला होणारा फायदा करपात्र आहे. गुंतवणुकदार व्याज उत्पन्न परताव्यात जमा करू शकतो.
Post Office NSC च्या गणितानुसार, जर तुम्ही या योजनेत एक रक्कमी 10 लाख रुपये जमा केल्यास पाच वर्षानंतर मॅच्युरिटीवर एकूण 14,02,552 रुपये मिळतील. यामध्ये 4,02,552 रुपये केवळ व्याजाचे असतील. या योजनेतंर्गत 5 वर्षांत 20.58 लाख रुपये मिळवता येतात. त्यासाठी तुम्हाला 15 लाख रुपये गुंतवावे लागतील.चक्रव्याढ व्याजाचा या रक्कमेवर फायदा मिळेल. कम्पांऊंड इंटरेस्टच्या माध्यमातून 7 टक्के दराने तुम्हाला 6 लाख रुपयांचा फायदा मिळेल. त्यामुळे गुंतवणुकदाराला 20.58 लाख रुपये मिळतील. तुमच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात तुम्हाला फायदा मिळेल. पाच वर्षांसाठी तुम्ही योजनेत एक लाख रुपये गुंतवल्यास व्याजाद्वारे 1,38,949 रुपये मिळतील. तर 2 लाखांच्या गुंतवणुकीवर व्याजासहीत 2,77,899 रुपये हाती येतील. 5 लाख गुंतवणुकीवर 6,94,746 रुपये मिळतील.