नवी दिल्ली : सोने जोरदार रिटर्न (Gold Return) देईल, असा सर्वांना वाटत असताना चांदीने सोन्यावर कुरघोडी केली. परतावा देण्यात चांदी आघाडीवर आहे. सोन्याचा भाव 60,455 रुपयांच्या पुढे गेला होता. सोन्याने भावात एक विक्रम केला होता. पण कमाई झाली ती चांदीमुळे. मार्च महिन्यातील 30 दिवसांत गुंतवणूकदारांना जास्तीतजास्त 12 टक्के परतावा दिला आहे. तर सोन्याने जवळपास 7 टक्के परतावा दिला आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल आणि चीनमधील परिस्थिती सुधारत असल्याने चांदीची (Silver Return) मागणी वाढली आहे. यामुळे चांदीच्या भावात तेजी दिसून येत आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूकदारही अचंबित झाले आहे. आतापर्यंत सोनेच सर्वाधिक कमाई करुन देणारी सुरक्षित गुंतवणूक मानण्यात येत होती.
तज्ज्ञांचे मत काय
आयआयएफएलचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितले की, मार्च महिन्यात भावात वाढ दिसून आली. सध्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री जोरात सुरु आहे. ईव्हीमधील मागणीत मोठी वाढ झाली आहे. चीनमधील परिस्थिती सुधारत आहे. झिरो कोविड पॉलिसीत नरमाई आल्याने त्याचा परिणाम दिसून येत आहे. मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने चांदीच्या भावात वाढ दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत चांदी 74 हजारांच्या घरात असेल.
हॉलमार्क क्रमांक अनिवार्य
ग्राहक मंत्रालयाने शुक्रवारी सोने आणि दागिन्यांच्या खरेदी विक्रीसाठी नियमात बदल केला आहे. 1 एप्रिलपासून हॉलमार्क क्रमांकाशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही. नवीन नियमानुसार, 31 मार्च, 2023 नंतर चार अंकी हॉलमार्क युनिक ऑयडेंटिफिकेशन (HUID) आभुषणे आणि दागिने खरेदी-विक्री करता येणार नाही. 1 एप्रिलपासून सहा आकडी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग दागिनेच मान्य राहतील.
एका मिस्ड कॉलवर भाव
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
मार्च महिन्यात चांदीची चमक वाढली
30 मार्च पर्यंत चांदीच्या भावात 7,477 रुपयांची वाढ दिसून आली.
20 फेब्रुवारी रोजी MCX वर चांदीचा भाव 64,623 रुपये प्रति किलो होता.
30 मार्च रोजी MCX वर चांदीचा भाव 72,100 रुपये प्रति किलो होता.
याचा अर्थ मार्च महिन्यात गुंतवणूकदारांना चांदीने 11.57 टक्के परतावा दिला.
आज वायदे बाजारात चांदीचा भाव 72,000 रुपये प्रति किलोवर उघडला.
सोन्याचे भाव वधारले
मार्च महिन्यात सोन्याचे भाव 60,455 रुपयांपेक्षा अधिक होते.
28 फेब्रुवारी रोजी सोन्याचे भाव 56,093 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
30 मार्च रोजी सोन्याचा भाव 59,968 रुपये प्रति तोळा होते.
सोन्याच्या भावात 3,875 रुपये प्रति तोळा दरवाढ दिसून आली.
आज वायदे बाजारात सोन्याचा भाव 59,910 रुपयांवर उघडला.