मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. विशेष म्हणजे आज कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ पहायला मिळत आहे. युरोपीयन युनियनकडून युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून कच्चे तेल खरेदी न करण्याचा निर्णय (EU bans russian oil import) घेण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude oil) दरात तेजी पहायला मिळत आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 124 डॉलर वर पोहोचले आहेत. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी तेजी पहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच केंद्राकडून पेट्रोल, डिझेवर आकारण्यात येणाऱ्या अबकारी करात कपात करण्यात आल्याने पेट्रोल प्रति लिटर साडेनऊ रुपये तर डिझेल प्रति लिटर सात रुपयांनी स्वस्त झाले आहे.
आज जाहीर करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे प्रति लिटर 111.25 आणि 95.73 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा रेट 111.41 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा रेट 95.92 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोचा दर प्रति लिटर 112.97 रुपये तर डिझेलचा दर 98.89 रुपये एवढा आहे. पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111. 30 तर डिझेलचा रेट प्रति लिटर 98 रुपये एवढा आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.54 रुपये एवढा आहे.
आज पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये असून, डिझेलचा दर 89.62 रुपये एवढा आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 106.03 रुपये मोजावे लागत असून, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर इतके आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे.