मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून आज इंधनाचे नवे दर (Fuel Prices) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या भावात (Petrol Diesel Price Today) कोणताही बदल करण्यात आला नसून, इंधनाचे दर स्थिर आहेत. पेट्रोल,डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वाहतूक खर्च वाढल्याने जवळपास सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. दरम्यान महागाईपासून जनतेला दिसाला देण्यासाठी केंद्र सरकारने एक्साइज ड्यूटीमध्ये (Excise Duty) कपात केली. एक्ससाइज ड्यूटीमध्ये झालेल्या कपातीमुळे पेट्रोल प्रति लिटरमागे साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्राकडून करण्यात आलेली ही दुसरी कपात ठरली यापूर्वी चार नोव्हेंबर 2021 रोजी देखील अबकारी करात कपात करण्यात आली होती. एक्साइज ड्यूटीमध्ये कपात करण्यात आल्यापासून इंधनाचे दर स्थिर आहेत. आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये एवढा आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये एवढा आहे.
पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे. पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111. 30 तर डिझेलचा रेट प्रति लिटर 98 रुपये एवढा आहे. नागपूरमध्ये पेट्रोल, डिझेलचा प्रति लिटर दर अनुक्रमे 111.41 आणि 95.92 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोचा दर प्रति लिटर 112.97 रुपये असून, डिझेलचा भाव 98.89 रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 11.25 तर डिझेलचा भाव प्रति लिटर 95.73 रुपये एवढा आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये असून, एक लिटर डिझेलसाठी 95.54 रुपये मोजावे लागत आहेत.
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच एक्साइज ड्यूटीमध्ये कपात करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र एक्साइज ड्यूटीमध्ये झालेल्या कपातीला पेट्रोल पंप चालकांकडून विरोध करण्यात येत आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे मोठे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्याचा याचा निषेध करण्यासाठी तसेच आपल्या विविध मागण्यांसाठी आज पेट्रोल पंप चालकांकडून इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आज पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवू शकतो.