नवी दिल्ली : सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात (gold-silver rate) मोठी घसरण पहायला मिळत आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचा दर (gold price) प्रति तोळा 47,750 रुपये एवढा आहे. शुक्रवारी 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48,100 रुपये इतका होता. 22 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 350 रुपयांची घसरण झाली आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर तोळ्यामागे 370 रुपयांनी घसरला आहे. आज 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,100 रुपये इतका आहे. तर शुक्रवारी 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,470 रुपये इतका होता. आज चांदीच्या दरात (silver rate) देखील मोठी घसरण पहायला मिळत आहे. शुक्रवारी चांदीचा दर प्रति किलो 62,700 रुपये इतका होता. आज चांदीचा दर प्रति किलो 61,700 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात आज किलोमागे तब्बल एक हजार रुपयांची घसरण झाली आहे.
आज जारी करण्यात आलेल्या सोन्याच्या भावाप्रमाणे राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये इतका असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,100 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,800 रुपये आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,150 रुपये एवढा आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,800 रुपये आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर 52,150 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 व 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा अनुक्रमे 47,800 आणि 52,150 रुपये एवढा आहे. औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,760 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,130 रुपये एवढा आहे.