नवी दिल्ली : आज पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात (gold, silver price) घसरण पहायला मिळत आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचा (gold) दर प्रति तोळा 47,500 रुपये इतका आहेत. मंगळवारी 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये इतकेा होता. याचाच अर्थ आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 250 रुपयांची घसरण झाली आहे. तर आज 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,820 रुपये असून, मंगळवारी 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,100 इतका होता. आज 24 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 280 रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदीच्या दरात (silver price) देखील घसरण पहायला मिळत आहे. आज चांदी किलोमागे एक हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. मंगळवारी चादींचे भाव प्रति किलो 61,600 रुपये इतके होते. तर आज चांदीचे दर 60,600 रुपये इतके झाले आहेत. सोन्याचे दर दिवसातून दोनदा जाहीर केले जातात. त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत पहायला मिळते.
आज सोने आणि चांदी दोन्हीच्या दरात घसरण पहायला मिळत आहे. राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,500 रुपये एवढा आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,820 रुपये एवढा आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,550 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,870 रुपये एवढा आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 आणि 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा अनुक्रमे 47,550 आणि 51,870 रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,550 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,870 रुपये एवढा आहे. औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,520 रुपये असून 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,8 40 एवढा आहे.