गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold- Silver Rate) तेजी दिसून येत आहे. मात्र सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर आज सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला असून, सोन्याचे दर किंचित कमी झाले आहेत. कमॉडिटी एक्सचेंजनुसार (MCX) सोन्याच्या (Gold) दरात आज 0.54 टक्क्यांची घसरण झाली आहे. नव्या दरानुसार आज बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 53,620 रुपये इतके आहेत. तर दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याच्या दरात 0.59 टक्क्यांची घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचे दर घसरणीसह 49,150 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले आहेत. चांदीचे भाव देखील कमी झाले असून, आज चांदीचे दर प्रति किलो 69,300 रुपयांवर पोहोचले आहेत. मंगळवारी राज्यात 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 54390 इतके होते, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 49860 रुपये प्रति तोळा होते. आंतराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूच्या किंमतीमध्ये सातत्याने चढउतार सुरू आहे. त्याचा परिणाम हा भारतीय सराफा बाजारावर होताना दिसत असून, भारतीय सराफा बाजारामध्ये सोन्या-चांदीचे दर अस्थिर होत आहेत.