मुंबई : आज सोने (gold Rate) चांदीच्या दरात (silver Rate) वाढ झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,950 रुपयांवर पोहोचले आहेत. बुधवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,700 रुपये इतके होते. आज 22 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 250 रुपयांची वाढ झाली आहे. तर 24 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 270 रुपयांची वाढ झाली आहे. आज 24 कॅरट सोन्याचे (gold) दर प्रति तोळा 52,310 रुपये इतके आहेत. तर बुधवारी 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52,040 रुपये इतके होते. दुसरीकडे आज चांदीचे दर देखील वधारले आहेत. आज चांदीचे दर प्रति किलो 62,200 रुपयांवर पोहोचले आहेत. बुधवारी चांदीचे दर प्रति किलो 62,100 रुपये इतके होते. आज चांदीच्या दरात किलोमागे 100 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर दिवसातून दोनदा जाहीर होतात. त्यामुळे सोन्याच्या दरात काही ठिकाणी तफावत आढळून येते.
आज जारी करण्यात आलेल्या दरानुसार मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याच्या दर प्रति तोळा 47,950 रुपये इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,310 रुपये एवढा आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याच्या दर प्रति तोळा 47,800 रुपये असून 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 52,360 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याच्या दर प्रति तोळा 47,800 रुपये आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,360 रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,800 रुपये आहे तर प्रति तोळा 24 कॅरट सोन्यासाठी 52,360 रुपये मोजावे लागत आहेत. औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47900 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचे भाव प्रति तोळा 52,350 रुपये एवढा आहे.