आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन! काय आहे या दिवसाचे महत्त्व, यंदाची थीम

| Updated on: Sep 10, 2022 | 3:27 PM

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आत्महत्येच्या विचारांबद्दल किंवा मानसिक तणावाबद्दल बोलल्याने आत्महत्या टाळता येऊ शकते, हे सांगण्याचे औचित्य म्हणजे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन!

आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन! काय आहे या दिवसाचे महत्त्व, यंदाची थीम
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन
Image Credit source: Social Media
Follow us on

World Suicide Prevention Day: आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्याबद्दल (Mental Health) जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जातो. आत्महत्या या विषयावर मोकळेपणाने बोलल्याने जीव वाचू शकतो, हे दर्शविण्यासाठी या दिवशी पिवळी रिबन (Yellow Rabin) लावली जाते. आत्महत्येला नेहमीच पर्याय असतो हे या पिवळ्या रिबिनीद्वारे दर्शविण्याचा प्रयत्न आहे.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणजे काय?

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आत्महत्येच्या विचारांबद्दल किंवा मानसिक तणावाबद्दल बोलल्याने आत्महत्या टाळता येऊ शकते, हे सांगण्याचे औचित्य म्हणजे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन!     जगभरातील विविध उपक्रमांद्वारे आत्महत्या रोखण्यासाठी यादिवशी संदेश देण्यात येतो.   2003 पासून या दिवसाची सुरवात झाली.

हा वार्षिक जागरूकता दिवस इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाइड प्रिव्हेन्शन (IASP) द्वारे आयोजित केला जातो. IASP च्या मते प्रत्येक आत्महत्या विनाशकारी असते आणि त्याचा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर खोलवर परिणाम होतो. परंतु जागरूकता वाढवून, आपल्या सभोवतालच्या लोकांशी बोलून, आपण जगभरातील आत्महत्येच्या घटना कमी करू शकतो. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन हा आत्महत्येबद्दल जागरुकता निर्माण करण्याची आणि ती रोखण्यासाठी प्रयत्नांना चालना देण्याची संधी आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे या वर्षाची थीम?

यावर्षी आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध दिनाची थीम ‘क्रिएटिंग होप थ्रू ॲक्शन’ अशी आहे. 2021 पासून सुरू झालेली ही थीम 2022 पर्यंत सुरू राहील आणि 2023 मध्ये पुन्हा दिसेल. आत्महत्येला कायमच पर्याय असतो याची आठवण करून देणे हा या थीमचा उद्देश आहे. या दिवशी तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट टाकून किंवा एखाद्या मोहिमेत सामील होऊन जागरूकता निर्माण करू शकता.