मुंबई : आज सोन्याच्या दरात (gold rate) तेजी दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे चांदी (silver) स्वस्त झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,700 रुपये एवढे आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 50,950 रुपयांवर पोहोचले आहेत. गुरुवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,300 इतके होते. त्यामध्ये आज तोळ्यामागे 400 रुपयांची वाढ झाली आहे. तर गुरुवारी 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 50,510 रुपये इतका होता. 24 कॅरट सोन्याच्या दरात आज 440 रुपयांची वाढ होऊन ते 50,950 रुपये झाले आहेत. एकीकडे सोन्याच्या दरात आज तेजी दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे चांदीचे दर (silver rate) मात्र स्वस्त झाले आहेत. गुरुवारी चांदीचे दर प्रति किलो 65,000 रुपये इतके होते. मात्र आज चांदीमध्ये किलोमागे 3 हजार 300 रुपयांची घसरण झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 61,700 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर हे दिवसांतून दोनदा जाहीर होतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू होताच सोन्याचे दर जाहीर केले जातात. तर दुसऱ्यांदा सायंकाळच्या वेळी, त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत आढळून येते.
आज जारी करण्यात आलेल्या सोन्याच्या दरानुसार सोने महाग झाले आहे. राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,700 रुपये आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,950 रुपये आहे. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,700 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,950 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,700 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,950 रुपये इतका आहे. सध्या देशात सर्वाधिक महाग सोने हे चेन्नईमध्ये आहे. चेन्नईत एक तोळा 22 कॅरट सोन्यासाठी 47,860 रुपये तर प्रति तोळा 24 कॅरट सोन्यासाठी 52,210 रुपये मोजावे लागत आहेत.