मुंबई : आज सोन्याच्या दरात तेजी आल्याचे पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात (silver prices) मात्र घसरण झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचा दर (gold rate) प्रति तोळा 47,750 रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,150 रुपये इतका होता. म्हणजेच आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 600 रुपयांची वाढ झाली आहे. आज 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 52,090 इतका असून, सोमवारी 24 कॅरट सोन्याचा (gold) दर प्रति तोळा 51,430 रुपये इतका होता. आज 24 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 660 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे मात्र आज चांदीचे दर घसरले आहेत, आज चांदीचे दर प्रति किलो 61,300 रुपये आहेत. सोमवारी चांदीचे दर प्रति किलो 62,100 रुपये इतके होते. आज चांदीच्या दरात प्रति किलो मागे 800 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर हे दिवसातून दोनदा जाहीर होत असल्याने, अनेकदा भावामध्ये तफावत आढळून येते.
आज राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,090 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये एवढा आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,090 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये 22 व 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा अनुक्रमे 47,750 आणि 52,090 रुपये आहे. भारतात सर्वाधिक महाग सोने चेन्नईमध्ये असून, चेन्नईत 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48,230 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,600 रुपये इतका आहे. अहमदाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,820 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,160 रुपये इतका आहे.
आज राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये एवढा आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,090 रुपये इतका आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,250 रुपये असून 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,480 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,250 इकता आहे. तर प्रति तोळा 24 कॅरट सोन्यासाठी 51,480 रुपये मोजावे लागत आहेत. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,250 रुपये इतका असून 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,480 इतका आहे.