मुंबई : आज सोन्या-चांदीच्या दरात (Gold-silver prices) तेजी पहायला मिळत आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,300 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 24 कॅरट सोन्याचा (Gold) भाव प्रति तोळा 50,510 रुपये एवढा आहे. बुधवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,100 इतके होते. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 50,290 एवढा होता. याचाच अर्थ आज 22 कॅरट सोन्याच्या दरात तोळ्यामागे 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर 24 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळा 220 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी भाववाढ पहायला मिळत आहे. बुधवारी चांदीचे दर प्रति किलो 61,000 रुपये इतके होते. तर आज चांदीचा (silver) भाव प्रति किलो 65,100 रुपयांवर पोहोचला आहे. आज चांदीच्या दरात 4,100 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर हे दिवसातून दोनदा बदलतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू झाल्यानंतर तर दुसऱ्यांदा सायंकाळच्या वेळी त्यामुळे सोन्याच्या दरात अनेकदा तफावत आढळून येते.
आज राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,300 रुपये इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,510 रुपये इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,300 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,510 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,300 आणि 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,510 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,470 रुपये असून 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,780 रुपये आहे. देशात सर्वाधिक महाग सोने हे चेन्नईमध्ये आहे.
आज मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,300 रुपये आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,510 रुपये इतका आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,360 असून 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,570 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 व 24 कॅरट सोन्याचा दर अनुक्रमे 46,360 आणि 50,570 इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,360 तर 24 कॅरट सोन्याचा दर 50,570 इतका आहे. आज राज्यात चांदीचा दर प्रति किलो 65,100 इतका आहे.
चांदीच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. चांदीचा उपयोग हा प्रामुख्याने दोन कारणांसाठी होतो. एक म्हणजे उद्योगासाठी तसेच दुसरा उपयोग हा दागीने आणि शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी. कोरोनाचे संकट टळल्यामुळे आता उद्योग क्षेत्रातून चांदीची मागणी वाढली आहे. चांदीच्या मागणीत वाढ झाल्याने चांदीचे भाव देखील वाढले आहेत. आज चांदीच्या दरात तब्बल चार हजारांपेक्षा अधिक वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.