मुंबई : आज सलग सोळाव्या दिवशी पेट्रोल (Petrol )आणि डिझेलच्या (Diesel) दरात कोणतीही बदल झालेला नाही. सहा एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर (price) स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सध्या प्रति बॅरल 108-110 डॉलर आहे. आज दिल्लीत पेट्रोलचा दर 105.41 रुपये इतका आहे. तर मुंबईत 120.51 रुपये आहे. तर कोलकातामध्ये 112.12 रुपये इतका पेट्रोलचा दर आहे. चेन्नईमध्ये 110.85 रुपये प्रति लिटर पेट्रोलचा दर आहे. डिझेलच्या किंमतींबद्दल बोललल्यास डिझेलचा दर दिल्लीत 96.67 मुंबईत 104.77 रुपये आहे. कोलकात्यात 99.83 प्रति लिटर इतका आहे. तर 100.94 रुपये प्रति लिटर इतका दर चेन्नईत आहे. नोएडामध्ये पेट्रोलची किंमती 105.41 रुपये आणि डिझेलची किंमत 96.97 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर दबाव आहे. सध्या ते 105 डॉलरच्या जवळ आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार मार्च तिमाहीत किमतीत वाढ न केल्याचा फटका IOC, BPCL, HPCL सारख्या कंपन्यांना सहन करावा लागणार आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे या तेल विपणन कंपन्यांनी 137 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. 10 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल आले आणि 2 मार्चपासून दरवाढ सुरू झाली. 6 एप्रिलपर्यंत राजधानी दिल्लीत पेट्रेल 10 रुपयांनी महागले होते. त्यानंतर त्यात कोणताही बदल झालेला नाही.
फिच रेटिंगने आपल्या ताज्या अहवालात म्हटलंय की, तेल विपणन कंपन्यांना किंमत न वाढवण्याचा तोटा सहन करावा लागेल. फिच रेटिंग्सने म्हटले आहे की नोव्हेंबर 2021 ते मार्च 2022 दरम्यान कच्चे तेल सुमारे 27 डॉलरने महाग आहे. या काळांत दर नियंत्रणात आले नसते तर पेट्रोल सुमारे तेरा रुपायंनी महागले असते.
आम्ही तुम्हाला सांगतो की इंडियन ऑईलचे ग्राहक आसएसपी सिटी कोड टाकून आणि 9224992249 वर मेसेड पाठवून त्यांच्या मोबईलवरुन पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. तुम्हाला इंडियन्स ऑइलच्या अधिकृत वेबसाइटवर शहर सापडेल. मॅसेज पाठवल्यानंतर तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर पाठवले जाईल.
इतर बातम्या
Health | उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नारळ पाण्याचा वापर करा, आरोग्याच्या अनेक समस्या दूर राहतील!
Nagpur : नागपूरमध्ये विनाहेल्मेट सरकारी बाबूंवर आजपासून कारवाई, राज्याच्या परिवहन आयुक्तांचे आदेश
Sher Shivraj Review: ‘शेर शिवराज’ची दुमदुमणारी गर्जना; बरंच काही शिकवून जातो प्रतापगडाचा रणसंग्राम