मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर आहेत. दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून महागाईपासून दिलासा देण्यासाठी पेट्रोल, डिझेलच्या अबकारी करात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर पेट्रोल प्रति लिटर 9:30 रुपये तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले. दरम्यान केंद्रापाठोपाठ अनेक राज्यांनी देखील पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) व्हॅटमध्ये कपात केल्याने पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त झाल्याचे पहायला मिळाले. सहा एप्रिल ते 22 मार्च या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल दीड महिना पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर होत्या. मात्र त्यानंतर गेल्या आठवड्यात शनिवारी केंद्राने अबकारी करता कपात करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले आहे.
पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 111.35 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे.