नवी दिल्ली | 6 जानेवारी 2024 : भारतात डिजिटल पेमेंटने क्रांती आणली आहे. झटपट आणि सहज रक्कम अदा करता येत असल्याने त्याचा वापर वाढला आहे. या डिजिटल प्रणालीचा वापर वाहतूक पोलिसांनी पण सुरु केला आहे. देशातील अनेक शहरात वाहतूक चलन भरण्यासाठी वाहनधारकांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. तर काही शहरातील पोलिसांनी पेटीएम वा इतर युपीआयचा वापर सुरु केला आहे. या डिजिटल सेवेमुळे दंडाची रक्कम भरण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. या एपवरुन सहज दंडाची रक्कम भरता येईल.
ऑफलाईन सुविधा
देशातील त्या त्या शहरात ट्रॅफिक चलन भरण्याची ऑफलाईन सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला संबंधित पोलिस स्टेशनमध्ये जावे लागते. ज्या परिसरात तुमच्या वाहनाचे चलन कापण्यात आले. तिथे गेल्यावर अधिकाऱ्याला भेटून चलनाची रक्कम भरावी लागते. ही पद्धत ऑफलाईन आहे. रोख रक्कम दिल्यानंतर अधिकारी तुम्हाला दंडाची पावती देतो. दंडाची रक्कम भरल्यानंतर पावती घ्यायला विसरु नका.
पेटीएमवर पण सुविधा
परिवहन मंत्रालयाच्या वेबसाइटवरही भरा चलन
रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाच्या (MoRTH) संकेतस्थळावर वाहनधारकांना ऑनलाईन चलन भरता येईल. www.echallan.parivahan.gov.in वर क्लिक करुन चलन क्रमांक, वाहन क्रमांक आणि तुमचा वाहन परवाना क्रमांक नोंदवावा लागेल. पुढील प्रक्रिया करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल. अनेक शहरात इतर युपीआय पेमेंट एपचा पण वापर करण्यात येतो. तुमच्या शहरातील पोलीस कोणती सुविधा देतात, त्याची पण माहिती घ्या.