नवी दिल्ली : तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच. पर्यटन, प्रवास आणि आयुष्य जगण्याची, मौज करण्यासाठी काहींना प्रवास करणे आवडते. काही ना छंदच असतो. त्यांना देशच नाही तर जग पालथे घालायचे असेत. पण प्रवास आला म्हणजे जोखीम (Risk) आलीच. जीवाला धोका आलाच. प्रवासात वस्तू ,पासपोर्ट, हरविण्याची भीती आलीच. विमानाचे उड्डाण रद्द होणे, विमान उड्डाणास उशीर होणे, या समस्यांचा सामाना करावा लागतो. पण या सर्वांचाच विमा काढून मिळाला तर! जर तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स (Travel Insurance) खरेदी केला तर तुम्हाला संरक्षण मिळते. तुम्हाला प्रवाशी विमा खरेदी करायचा असेल तर त्यासंबंधीची माहिती असणे आवश्यक आहे.
Premium कसा ठरवता येतो
तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सचा प्रीमियम, तुम्ही कोणता प्लॅन खरेदी करता, त्याआधारे ठरतो. तुमची सहल किती दिवसांची आहे. किती दिवस तुम्ही प्रवास करणार आहात. सिंगल ट्रिप प्लॅन, मल्टी ट्रिप प्लॅन, विद्यार्थ्यांची योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, याआधारे हप्ता निश्चित होतो. याशिवाय तुमच्या सुट्यांच्या हिशोबाने तुमच्या प्रवाशी विम्याचा हप्ता निश्चित होतो. तुम्हाला सोयी-सुविधा हव्या असतील तर त्याआधारे अतिरिक्त रक्कम देऊन विम्याचे संरक्षण वाढवता येते.
पर्यटन विमा, प्रवास विम्याचे वैशिष्ट्ये म्हणजे, तुम्ही कुटुंबियांसह प्रवासाला निघालात. तुमच्या घराची काळजी कोण घेईल. अशावेळी तुम्हाला या योजनेतच होम इन्शुरन्स जोडता येतो. महागड्या वस्तू आणि इतर गोष्टींसाठी ॲड ऑनची सुविधा मिळते. पण त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त रक्कम मोजावी लागेल. या सर्व प्रकारात विम्याची रक्कम वाढेल. पण
त्याचा फायदा ही होईल.
यासाठी नाही मिळत विमा
ट्रॅव्हल विमा पॉलिसीत सध्याचा आजार, युद्ध, लढाई, आत्महत्या, दंगल, स्थानिक अचानक उसळलेली परिस्थिती यामुळे काही नुकसान झाले तर त्याचा विम्यात समावेश होत नाही. विमा कंपन्या तुम्हाला त्याची नुकसान भरपाई देत नाहीत. त्यासाठी ॲड ऑनची मदत मिळते. पण यासंबंधी विमा प्रतिनिधी, विमा कंपनी यांच्याकडून स्पष्ट माहिती घ्या.
या गोष्टी लक्षात ठेवा