मुंबई, आज आधार कार्ड हे ओळख पटवून देण्यासाठीचे सर्वात मोठे दस्तावेज बनले आहे. एखाद्याची ओळख प्रमाणित करण्यासाठी ते ऑफलाइन किंवा ऑनलाइन वापरले (Use Of Aadhar) जाऊ शकते. पण, ते वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी (Tips for security) लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार वापरताना काय करावे आणि काय करू नये हे स्पष्ट करणारे परिपत्रक जारी केले आहे.
बँकेत खाते उघडायचे असो, शाळा-कॉलेजात प्रवेश घ्यायचा असो, फोन सिम घ्यायचा असो किंवा सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असो, सगळीकडे त्याची गरज असते. पण तुमचे आधार कार्ड वापरताना काळजी घेण्याची गरज आहे, थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला अडचणीत आणू शकतो.
आधार ही तुमची डिजिटल ओळख आहे. जेव्हा जेव्हा ओळख सिद्ध करायची असते तेव्हा आधार कार्ड यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
एखाद्या कामासाठी आधार क्रमांक देताना मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, UAN शेअर करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.
ज्या कामासाठी तुम्ही तुमचे आधार कार्ड शेअर करत आहात, तेथे तुमची संमती अनिवार्यपणे घेतली जाईल. आधार कार्डची प्रत देताना त्यावर संबंधित कामाचा उल्लेख अवश्य करावा.
तुम्हाला तुमचा आधार क्रमांक शेअर करायचा नसेल, तर तुम्ही त्याऐवजी UIDAI द्वारे प्रदान केलेला व्हर्च्युअल आयडी (VID) वापरू शकता. हे जनरेट करणे खूप सोपे आहे आणि आधार क्रमांकाने बदलले जाऊ शकते.
सामान्यतः लोक आधार कार्ड किंवा नंबर जिथे आवश्यक असेल तिथे देत असतात. अशा परिस्थितीत, तुम्ही एम-आधार ॲप किंवा UIDAI वेबसाइटवर वेळोवेळी प्रमाणीकरण इतिहास तपासत राहणे फार महत्वाचे आहे. या ठिकाणी मागील 6 महिन्यात तूंच आधार क्रमांक कुठे आणि कोणत्या कामासाठी वापरला गेला याचा सहा महिन्यांचा आधार इतिहास उपलब्ध असतो.
तुमचा आधार ईमेलसोबत लिंक करा. कारण UIDAI आधार प्रमाणीकरणाची माहिती ईमेलद्वारे देखील प्रदान करते. यासह, जेव्हा जेव्हा आधार प्रमाणीकृत होईल तेव्हा त्याची माहिती ईमेलद्वारे तुमच्यापर्यंत येईल. याशिवाय, OTP आधारित आधार प्रमाणीकरण वापरण्यासाठी आधारमध्ये प्रविष्ट केलेला मोबाइल नंबर नेहमी अपडेट ठेवा.
UIDAI आधार लॉकिंग आणि बायोमेट्रिक लॉकिंगची सुविधा प्रदान करते. जर तुम्ही बराच काळ आधार वापरत नसाल तर तुम्ही आधार किंवा बायोमेट्रिक्स लॉक करू शकता. तुम्हाला ते वापरायचे असेल तेव्हा ते अनलॉक करा.
आधारचा गैरवापर झाल्यास, तुम्ही UIDAI च्या टोल फ्री क्रमांक 1947 वर 24X7 तक्रार करू शकता. किंवा तुम्ही तक्रार नोंदवण्यासाठी help@uidai.gov.in देखील वापरू शकता.