नवी दिल्ली : आधार कार्ड (Aadhaar Card Update) हे सध्या सर्वात महत्वाचे कागदपत्रे झाले आहे. सध्या बँक खाते असू द्या की पहिला गॅस सिलिंडरचे घ्यायचे असू द्या यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डची आवश्यकता लक्षात घेता, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक मोठा निर्णय घेतला आहे.
UIDAI नुसार, सर्व राज्यांना आधार कार्डच्या सेवेचा परीघ वाढविण्याची माहिती देण्यात आली आहे. UIDAI ने सर्व नागरिकांचे आधार कार्ड दर 10 वर्षांनी अद्ययावत (Update) करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दर 10 वर्षांनी नागरिकांना त्यांचे आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे.
नागरिकांना बायोमॅट्रिक डाटा अद्ययावत करावा लागणार आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणांना काम करावे लागणार आहे. त्यांना नागरिकांना याविषयीची माहिती द्यावी लागणार आहे.
प्रशासकिय यंत्रणेला यासाठी लवकरच कामाला लावले जाणार असले तरी नागरिकांवर बायोमॅट्रिक अपडेटसाठी कुठलेही बंधन आणण्यात येणार नाही. ही संपूर्णतः ऐच्छिक बाब असेल. परंतु, योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड अपडेट ठेवावे लागेल.
आधार कार्ड अपडेट केल्यामुळे बोगस आधार कार्डला आळा बसेल असा विश्वास UIDAI ला आहे. यासंबंधीची अधिसूचना प्राधिकरणाने काढली आहे. प्रत्येक नागरिक आता दहा वर्षांनी त्याची बायोमॅट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती अद्ययावत करु शकतो, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
आधार कार्ड सतत अपडेट ठेवणे हे केवायसीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. तसेच अनेक योजनांसाठी अद्ययावत आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डमधील माहिती एकदम योग्य असणे आवश्यक आहे.