ग्राहकाभिमुख सेवांनी ग्राहकांचे ‘उज्जीवन’ , उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा नवउपक्रम

| Updated on: Mar 15, 2022 | 9:04 AM

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने ग्राहकाभिमुख सेवांद्वारे बँकिंग अधिक सहज आणि सुलभ केली आहे. ग्राहकांना सहा महिन्यांत एकदा त्यांचा मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याची सुविधा ही बँकेने उपलब्ध करुन दिली आहे.

ग्राहकाभिमुख सेवांनी ग्राहकांचे उज्जीवन , उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा नवउपक्रम
bank
Follow us on

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने (Ujjivan small finance bank) ग्राहकांसाठी आणखी एक मोठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही सुविधा ऑनलाईन मोबाईल क्रमांक अद्ययावत (Mobile Number Update) करण्यासंबंधीतील आहे. आपल्या लोकाभिमूख सोयी-सुविधांमुळे ग्राहकांना ही बँक सहज आणि सुलभ बँकिंग सेवा पुरवते. ग्राहकाने मोबाईल क्रमांक बदलला तर तो बँकेत सहज अपडेट करण्यासाठी बँकेने सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही डिजिटल ऑन बोर्डिंग सुविधा आहे. मायक्रो बँकिंग कस्टमरसाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑनलाईन बँकिग व्यवहारांसाठी मोबाईल क्रमांक अद्ययावत असणे आवश्यक असते. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ग्राहकाला ओटीपी (OTP) येतो. त्यानंतर व्यवहार पूर्ण करण्यात येतात. ही गरज ओळखून उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने ग्राहकांसाठी मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याची नवीन सेवा सुरु केली आहे.

60 लाख ग्राहकांना मोठा फायदा
या निर्णयामुळे बँकेच्या 60 लाख ग्राहकांना मोठा फायदा होईल. ग्राहक विना कागदपत्रे, रियल टाईमआधारीत, सुरक्षित आणि थेट ओटीपी आधारीत पुनर्पडताळ्याने बँकिंग व्यवहार, मोबाईल क्रमांक अद्ययावत करुन करु शकतील. त्यानंतर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक असिस्टेड अॅपच्या मदतीने बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण करता येईल. बँकेने याविषयीची माहिती दिली आहे. बँकिंग व्यवहारात ग्राहकांना मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे फार अवघड असते. त्यासाठी बँकेत जावून कागदपत्रे सादर करावी लागतात. तसेच यासाठी बराच अवधीही खर्च होतो. परंतु, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने या सर्व किचकट प्रक्रियेला फाटा दिला आहे. बँकेचे ग्राहक ऑनलाईन पद्धतीने मोबाईल क्रमांक अद्ययावत करु शकतात आणि या प्रक्रियेसाठी एका ही कागदपत्राची गरज पडत नाही. हे काम पुर्णतः डिजिटल होते.

असा करा मोबाईल क्रमांक अपडेट
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्यासाठी प्रक्रिया सांगितली आहे. त्यानुसार, डिजिटल ऑन बोर्डिंग सुविधेचा वापर करता येईल. अथवा कोणत्याही वेळी बँकेच्या शाखेत जाऊन वा बँकेच्या कोणत्याही फिल्ड कर्मचा-याशी संपर्क साधून मोबाईल क्रमांक सहा महिन्यांत एकदा अपडेट करता येईल. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड प्रमुख अल्प अर्थ पुरवठा बँका आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना खात्यात जमा रक्कमेवर सर्वाधिक व्याज देते. बँक बचतीवर ग्राहकांना 6.75 टक्के व्याज देते. जी बाजारातील अन्य कोणत्याही बँकेपेक्षा अधिक आहे. ग्राहकांच्या 10 कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीवर 6.75 टक्के व्याज देण्यात येते. या बँकेकडे महिला ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे.

संबंधित बातम्या

महागाईचा भडका! हिंदुस्थान युनिलिव्हरचा ग्राहकांना धक्का; चहा, कॉफीच्या भावात 14 टक्क्यांची वाढ

कच्च्या तेलाच्या वाढत्या भावाचा प्रवाशांना फटका; विमान प्रवास महागला, तिकिटांच्या दरामध्ये 15 ते 30 टक्क्यांची वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीचा श्रीलंकेला फटका; इंधनाच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या भारतात काय स्थिती?