नवी दिल्ली : आधार (Aadhaar Card) आजच्या काळात अत्यंत आवश्यक पुरावा मानण्यात येतो. आधारकार्डची आवश्यकता अनेक सरकारी आणि गैर सरकारी कामासाठी करण्यात येतो. त्यामुळे याविषयीच्या ज्या काही सूचना येतात, त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी नवीन निर्देश देते. आधार कार्डची एजन्सी UIDAI ने याविषयीचे एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी नवीन माहिती दिली. त्यानुसार, आधार कार्डला 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आधार कार्ड अपडेट (Aadhar Update) करणे आवश्यक आहे. आधार कार्ड अपडेट करण्याचे दोन प्रकार आहेत.
तुम्ही आधारकार्ड ऑनलाईन अथवा ऑफलाईन माध्यमातून अपडेट करु शकता. ऑनलाईन माध्यमातून आधार अपडेट करण्यासाठी 25 रुपये तर ऑफलाईन पद्धतीने आधारकार्ड अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात येते.
युआयडीएआयने नागरिकांना महाठगांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी याविषयीचे ट्विट केले आहे. त्यात नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही ठग नागरिकांची फसवणूक करत असल्याचे म्हटले आहे. ते विविध आयडियाची कल्पना लढवत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवरती, मोबाईलवर आलेल्या मॅसेजवर, ईमेलवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा बदमाशांपासून सावध राहण्याचा सल्ला एजन्सीने दिला.
जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जावे लागेल. याठिकाणी तुम्हाला आधार कार्ड अपडेट करता येईल. तुम्ही तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्राची यादी तपासा. अथवा प्ले स्टोअरमधून उमंग ॲपच्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करा.
यदि आपका आधार दस साल पहले बना था और इसे अपडेट नहीं किया गया है, तो आपसे अनुरोध किया जाता है कि आप अपनी ‘पहचान के प्रमाण’ और ‘पते के प्रमाण’ के दस्तावेजों को अपलोड कर इसे फिर से सत्यापित करें।ऑनलाइन अपलोड करने का शुल्क 25 रुपये और ऑफलाइन के लिए 50 रुपये है@GoI_MeitY @mygovindia pic.twitter.com/y9LXZ3ipVQ
— Aadhaar (@UIDAI) February 20, 2023
आधार कार्ड-पॅनकार्ड यांची जोडणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आयकर कायदा, 1961 नुसार, सर्वच पॅनकार्ड धारकांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 31 मार्च 2023 पूर्वीच आधारकार्ड-पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. 1 एप्रिल 2023 रोजीपासून पॅनकार्ड निष्क्रिय होईल.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मे 2017 मध्ये एक अधिसूचना प्रकाशित केली होती. त्यामध्ये आसाम, जम्मू आणि काश्मीर, मेघालय येथील नागरिकांना या प्रक्रियेतून सूट देण्यात आली होती. जे भारताचे नागरिक नाहीत. ज्यांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा नागरिकांनाही या श्रेणीतून बाहेर ठेवण्यात आले आहे.
गेल्यावर्षी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) एक अधिसूचना काढली होती. त्यात एकदा पॅनकार्ड निष्क्रिय झाले तर आयकर कायद्यानुसार त्याच्याविरोधात कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे करदात्यांसमोर तर मोठे संकट उभे ठाकणार आहे.
पॅनकार्ड निष्क्रिय झालेले करदाते प्राप्तिकर रिटर्न जमा करु शकणार नाहीत. तसेच त्यांना थकबाकीचीही प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. रिटर्नमध्ये त्रुटी असेल तर ती पूर्ण करता येणार नाही. तसेच कर कपातही जादा दराने होईल. आधार कार्ड-पॅनकार्डची जोडणी करण्यासाठी आता शुल्क आकारण्यात येत आहे.