Aadhaar Card : मोफत करा आधार कार्ड अपडेट! केवळ काही दिवसांसाठीच संधी

| Updated on: Mar 16, 2023 | 8:35 PM

Aadhaar Card : केंद्र सरकारने नागरिकांसाठी खास ऑफर आणली आहे. त्यानुसार, नागरिकांना त्यांचे आधारकार्ड ऑनलाईन मोफत अपडेट करता येईल. त्यासाठी ऑफलाईन कागदपत्रे द्यावी लागतील. किती दिवसांसाठी आहे ही सवलत

Aadhaar Card : मोफत करा आधार कार्ड अपडेट! केवळ काही दिवसांसाठीच संधी
Follow us on

नवी दिल्ली : जर तुम्ही आधार कार्ड मध्ये माहिती देताना अथवा ती भरताना चूक केली असेल तर ही चूक दुरुस्त करता येते. आधार कार्डमध्ये दुरुस्ती करता येते. या सुधारणेसाठी शुल्क आकारण्यात येते. पण केंद्र सरकारने आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update) करण्याची मोफत संधी दिली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांना ही सवलत दिली आहे. त्यानुसार, आधार कार्डमधील काही माहिती अपडेट करण्यासाठी मोफत संधी देण्यात आली आहे. आता ऑनलाईन आधार कार्ड अपडेटसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. तर आधार केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला कमीत कमी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल.

युआयडीएआयने नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन आधार कार्ड अपडेटची सुविधा दिली आहे. आधार कार्डमध्ये ऑनलाईन बदल केल्यास, त्यासाठी तुम्हाला एक छद्दामही द्यावा लागणार नाही. 15 मार्च ते 14 जून, 2023 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला आधार कार्डमध्ये मोफत बदल करता येणार आहे. त्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. UIDAI ने 10 वर्षांपेक्षा अधिक जुन्या आधार कार्ड धारकांना त्यांची माहिती अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.

UIDAI च्या डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत myAadhaar पोर्टलवर तुम्हाला मोफत आधारकार्ड अपडेट करता येईल. कागदपत्रे अपलोड करता येईल. पोर्टलवर आईडी प्रूफ आणि प्रूफ ऑफ एड्रेस (PoI/PoA) टाकून आधार कार्ड दुरुस्त करता येईल.

हे सुद्धा वाचा

तुम्ही आधारा कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने काही माहिती अपडेट (Aadhaar Online Update) करु शकता. तर काही माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन कागदपत्रे जमा करावी लागतात. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता आणि भाषा बदलवू शकता, त्यात बदल करु शकता. ऑनलाईन दुरुस्तीसाठी, सुधारणेसाठी तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

 

  1. आधार कार्डमध्ये ऑनलाईन नावात बदल करण्यासाठी ओळखपत्राची स्कॅन कॉपी लागते
  2. जन्मतारीख अपडेट करण्यासाठी जन्मप्रमाणपत्राची स्कॅन कॉपीची गरज पडते
  3. लिंग बदलाविषयी कोणतेही कागदपत्रे द्यावे लागत नाही
  4. तुम्हाला तुमची भाषा पण ऑनलाइन SSUP पोर्टल, मोबाईल एपच्या सहायाने बदलता येते
  5. सध्या या पोर्टलवर एकूण 13 भाषा आहेत

 

असे करा आधार कार्ड अपडेट

  1. UIDAI च्या सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलवर जा
  2. https://ssup.uidai.gov.in/ssup/ यावर लॉगिन करा
  3. तुमचा 12 अंकांचा आधारा कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका
  4. ओटीपी पाठविण्याचा पर्याय निवडा, त्यानंतर पुढील प्रक्रिया करा
  5. आधार संबंधीत मोबाईल क्रमांकावर हा ओटीपी येईल
  6. ओटीपी टाकून ‘अपडेट आधार ऑनलाइन’ हा पर्याय निवडा
  7. ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ हा पर्याय निवडा, माहिती भरा