जर तुम्हाला पैशांची चणचण भासत असेल आणि आता एकदम मोठी रक्कम कशी उभी करायची असा यक्ष प्रश्न तुमच्या समोर उभा ठाकला असेल तर फार भाबांवून जाण्याची गरज नाही. तुमची गुंतवणूकच (Investment) तुमच्या मदतीला धावून येईल. त्यासाठी कर्ज काढण्याची, उसनवारी करण्याची गरज नाही. कर्ज काढाल तर त्यावर व्याजही मोजावे लागेल. उसनवारी (Borrow) कराल तर मुदतीत व्याजासहित चुकतं करावे लागेल. म्हणजे हा व्यवहार तसा फार फायद्याचा नाही. गरज पूर्ण होईल. वेळ मारुन न्याल. मात्र तुमचे आर्थिक बजेट (Financial Budget) विस्कटेल. त्याचा नाहक भार तुमच्यावर पडेल. त्यापेक्षा कमी खर्चात रक्कम हवी असेल तर तुम्हाला अत्यावश्यक निधी उभारता येणे गरजेचे आहे. वित्त सल्लागारानुसार असा फंड उभारणे तुम्हाला गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.
जर तुमचा अत्यावश्यक गरजेसाठीचा निधी तेवढा मोठा नसेल तर अशावेळी दोन-तीन पर्यायांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. एकतर तुम्ही कर्ज घेऊ शकता अथवा तुम्ही साठवलेली रक्कम अर्थात गुंतवणूक खर्च करु शकता. अर्थात या दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे आहेत. पण गरजवंताला अक्कल नसते. तेव्हा ती फार वापरात ही येत नाही. आलेल्या परिस्थितीला शरण गेल्याशिवाय गत्यंतर नसते.
वित्तीय तज्ज्ञानुसार, जर गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक अत्यंत कमी उत्पन्न येत असेल आणि दुसरीकडे कर्जावर जास्त व्याज आकारण्यात येत असेल तर तुम्ही गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकता. जर एखाद्या डेट फंडावर 5 ते 6 टक्के व्याज मिळत असेल आणि कर्जावर 11-12 टक्के व्याज आकारण्यात येत असेल तर डेट फंडाचा पर्याय पहिल्यांदा समोर ठेवा. तो अत्यावश्यक वेळी वापरता येईल.
आता आणखी एक सोय आहे. इक्विटी फंडात तुमची एसआयपीद्वारे गुंतवणूक सुरु असेल तर उत्तमच. ही रक्कम ब-यापैकी मोठी असेल तर अत्यावश्यक वेळी हा फंड रिडिम करण्याचा म्हणजेच यातील रक्कम काढून घेण्याचा दीड शहापणा करु नका. त्यावर तुम्हाला कर्जाचा पर्याय आहे, तो निवडा. ही निवड तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल. एकतर जमा रक्कमेवर चक्रवाढ व्याज मिळत राहिल आणि कर्जाची परतफेड पण करता येईल.
वैयक्तिक कर्ज असुरक्षित वर्गवारीत येत असल्याने त्यावर व्याजदर चढा असतो. अशावेळी तुमची गुंतवणूक तुमच्या मदतीला धावून येईल. तुम्हाला सुरक्षित कर्जावर व्याज ही कमी लागते. हा एक फायदा राहिल. तसेच तुमची दर महिन्याची या फंडात एसआयपीद्वारे होणारी गुंतवणूक ही सुरु राहिल आणि व्याजदर कमी असल्याने त्यावरचा तुमचा हप्ता ही भरता येईल. यावर एक फायदा म्हणजे तुमच्या योजनेत कुठे ही खंड पडत नाही. चक्रवाढ व्याज मिळत राहते आणि तुम्हाला गरजेच्यावेळी अल्प कालावधीसाठी रक्कमही मिळते.
Russia Ukraine Crisis : इन्फोसिस रशियामधून आपला व्यवसाय गुंडाळणार, युक्रेनला 10 लाख डॉलरची मदत