मुंबई : जर तुम्ही दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा (Investment) प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासमोर एफडी फिक्स्ड डिपॉझिटचा (Fixed Deposit) सर्वोत्तम पर्याय असतो. अनेक जण आपली गुंतवणूक एखाद्या बँकेच्या (BANK) फिक्स्ड डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवतात. फिक्स्ड डिपॉझिट योजनेमध्ये पैसे गुंतवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमची रक्कम सुरक्षीत राहाते. बँक आणि पोस्टाच्या योजनांमध्ये शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडच्या तुलनेत रिस्क कमी असते. आता तर अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी टॅक्स सेव्हिंग एफडीची देखील योजना आणली आहे. या योजनेंतर्गत तुम्ही पैसा गुंतवल्यास इनकम टॅक्सच्या नियमानुसार तुम्हाला गुंतवणुकीवर सूट मिळते. मात्र तुम्ही जेव्हा एफडीमध्ये पैसे गुंतवतात तेव्हा हे देखील पहाणे आवश्यक असते की तुम्हाला गुंतवणुकीवर व्याज किती मिळणार? कारण जेवढे जास्त व्याज तेवढाच जास्त परतावा त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी किमान चार ते पाच बँकेत व्याजदराची चौकशी करावी. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बँकांची माहिती सांगणार आहोत, ज्या बँकांचा व्याजदर सर्वोत्तम आहे.