मुंबई : थंडीच्या दिवसात अनेकांना अंधोळीसाठी गरज पाण्याची गरज असते, त्यामुळे अनेकजण घरी गीजर (geyser) लावून घेतात. सध्या अनेकांनी आपल्या घरात गीजर लावला असेल. परंतु ज्यांना गीजर लावणे ज्यांना शक्य नाही, असे नागरिक वॉटर हीटर रॉड (Water Heater Rod) वापरतात. हा वॉटर हीटर रॉड अधिक धोकादायक असताना सुध्दा अनेकांच्या घरात आपल्याला पाहायला मिळतो. एक छोटीसी चुकी सुध्दा तुम्हाला महागात पडू शकते, (Water Heater Rod Safety Tips) त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागते.
वॉटर हीटर रॉड अधिक काळ चालतात, शक्यतो खराब होत नाहीत. पण दोन वर्षे जुन्या असलेल्या वॉटर हीटर रॉडला घरात वापरणं अधिक धोकादायक असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे शॉक लागण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर त्या वॉटर हीटर रॉडला अधिक वीज सुध्दा लागते. त्यामुळे तुम्हाला वॉटर हीटर रॉड खरेदी करायचा असल्यासं ओरिजनल कंपनीला खरेदी करा.
काही लोक वॉटर हीटर रॉडचा वापर अत्यंत चुकीच्या पद्धतीने करतात. म्हणजे बटन सुरु केल्यानंतर बादलीमध्ये टाकतात. त्यामुळे शॉक लागण्याची शक्यता अधिक असते. वॉटर हीटर रॉडला लागलेली घाण वेळोवेळी साफ करायला हवी, कारण लागलेली घाण साफ केली नाहीतर वॉटर हीटर रॉड पाणी गरम करण्यास अधिक उशीर लावतो.
प्लास्टिकच्या बादलीचा वापर करा
काही लोक स्टील आणि जर्मनच्या बादल्या पाणी गरम करण्यासाठी वापरतात. त्यामुळे वॉटर हीटर रॉडला आतमध्ये टाकल्यानंतर शॉक लागण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गरम पाणी करताना प्लास्टिकच्या बादलीचा वापर करा.