HUF म्हणजे नेमकं काय?, जाणून घ्या ‘एचयूएफ’च्या माध्यमातून तुम्हाला करात कशी सवलत मिळू शकते

| Updated on: May 02, 2022 | 5:40 AM

एचयूएफ म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंब . कुटुंबातील सर्व सदस्य एचयूएफ तयार करून त्यांचे कर दायित्व वाटून घेऊ शकतात. याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला इनकम टॅक्समधून अधिक सूट मिळू शकते. ती कशी सविस्तरपणे जाणून घेऊयात.

HUF म्हणजे नेमकं काय?, जाणून घ्या एचयूएफच्या माध्यमातून तुम्हाला करात कशी सवलत मिळू शकते
Follow us on

तुम्हाला कलम 80C अंतर्गत रु. 1.5 लाखांऐवजी रु. 3 लाख तुमच्या करपात्र उत्पन्नातून (Taxable income) वजा केले जावेत असे वाटते का? 2 विमा पॉलिसी (Insurance policy) घ्याव्यात आणि दोन्ही पॉलिसींच्या प्रीमियमवर सवलतीचा दावा करावा. करसवलत (Tax deduction) दुप्पट व्हावी आणि करप्राप्त उत्पन्न कमी व्हावं असे वाटते का? काळजी करू नका आम्ही तुम्हाला कर वाचवण्यासाठी तुमचे उत्पन्न लपवण्यास सांगत नाही. कायदेशीर पद्धतीनं संपूर्ण उत्पन्न दाखवून तुम्ही HUF द्वारे भरपूर कर वाचवू शकता. एचयूएफ म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंब . कुटुंबातील सर्व सदस्य एचयूएफ तयार करून त्यांचे कर दायित्व वाटून घेऊ शकतात. आयकर कलम 2 (31) प्रमाणं एचयूएफला एक व्यक्ती मानण्यात येते. एचयूएफचे वेगळे पॅनकार्ड असते. तुम्ही एचयूएफद्वारे आयकर रिटर्न देखील भरू शकता,
आणि कर-बचतीच्या गुंतवणुकीच्या साधनात गुंतवणूक देखील करता येते.

कर सवलतीचा फायदा

एचयूएफमुळे कर कमी भरावा लागतो. कर वाचवण्यासाठी कुटुंब त्यांच्या मालमत्तांमधून कमावलेले उत्पन्न एचयूएफच्या खात्यात समाविष्ट करतात. एचयूएफचा वापर बहुतांश वेळी वडिलोपार्जित मालमत्तेतून मिळालेले उत्पन्न दर्शविण्यासाठी केला जातो. व्यक्तीगत करदात्याप्रमाणेच एचयूएफला सवलती मिळतात. कलम 80C अंतर्गत सर्व प्रकारच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या सर्व कर सवलती एचयूएफला मिळतात.

एचयूएफच्या माध्यमातून कर कसा वाचवाल?

रोहनचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये आहे. स्टँडर्ड डीडक्शन केल्यानंतर करपात्र उत्पन्न 9.50 लाख रुपये येते. त्यांच्या वडिलोपार्जित घर भाड्याच्या उत्पन्नातून त्यांना 6 लाख रुपये मिळतात. घर भाड्याच्या उत्पन्नातून 1.80 लाख रुपयांची स्टँडर्ड डीडक्शन केल्यानंतर करपात्र भाड्याचं उत्पन्न 4.20 लाख रुपये होते. रोहनचे एकूण करपात्र उत्पन्न 13.70 लाख रुपये होते. कलम 80C अंतर्गत रु. 1.50 लाख आणि कलम 80D अंतर्गत रु. 25,000 ची सवलत मिळाल्यानंतर त्याचे करपात्र उत्पन्न रु. 11,95,000 इतक्या रुपयांवर येते. जुन्या कर प्रणाली अंतर्गत 1,77,840 रुपये कर द्यावा लागतो. जेव्हा 6 लाख रुपये भाड्याचे उत्पन्न रोहनच्या एचयूएफचे उत्पन्न म्हणून दाखवले जाते, तेव्हा कलम 80C अंतर्गत रु. 1,80,000 ची आणि रु. 1.50 लाखाची इतर स्टँडर्ड डीडक्शन केल्यानंतर 80D अंतर्गत रु. 25,000 च्या आरोग्य विमा प्रीमियम व्यतिरिक्त एचयूएफचे करपात्र उत्पन्न रु. 2,45,000 इकते होईल.

रकमेवरील कर शून्य

या रकमेवरील कर शून्य असेल कारण जेव्हा उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त असेल तेव्हाच एचयूएफवर कर आकारला जातो. जेव्हा रोहनच्या एकूण उत्पन्नातून भाड्याच्या उत्पन्नाचा हा भार काढून टाकला जाईल तेव्हा त्याला 70,200 रुपये कर भरावा लागेल. यामध्ये त्याच्या उत्पन्नावर आकारण्यात येणाऱ्या सेसचाही समावेश आहे. रोहनच्या एचयूएफच्या कराची रक्कम 1,77,840 रुपयांवरून केवळ 70,200 रुपये झाली आहे , अशा प्रकारे रोहनने सुमारे एक लाख रुपयांचा कर वाचवला आहे.

एचयूएफ कसे सेट करावे?

कोणतेही हिंदू कुटुंब एकत्र येऊन एचयूएफ करू शकतात. बौद्ध, जैन आणि शीख देखील एचयूएफ करू शकतात. पण एचयूएफ एकच व्यक्ती बनवू शकत नाही. संपूर्ण कुटुंबाद्वारेच एचयूएफची निर्मिती करण्यात येते. एकाच कुटुंबातील वंशज एचयूएफ तयार करू शकतात. कुटुंबाचा प्रमुख हा एचयूएफचा कर्ता असतो. पुरुष किंवा स्त्री ही कर्ता असू शकते. कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या जन्माच्या आधारावर एचयूएफचे संयुक्त वारसदार असे म्हंटले जाते आणि लग्नानंतर एचयूएफमध्ये आलेल्या व्यक्तींना सदस्य म्हणतात. उदाहरणार्थ, पत्नी, मुले आणि मुलांच्या बायका हे सर्व एचयूएफचे सदस्य असतात.