सध्याच्या जमान्यात आधार कार्ड हा जरुरी दस्तावेज आहे. प्रत्येक सरकारी आणि खासगी कामासाठी आधार हे महत्वाचे कागदपत्र ठरते. आधार 12 अंकांचा एक खास क्रमांक असतो. यामध्ये तुमचे नाव, पत्ता आणि फिंगरप्रिंट असा तपशील समाविष्ट असतो. विना आधार कार्ड तुम्हाला सरकारच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. गॅस कनेक्शनपासून ते इतर अनेक सबसिडी मिळविण्यापर्यंत आधाराचा उपयोग होतो. तर बँक खाते उघडण्यापासून ते शाळेत दाखला घेण्यापर्यंत आधार कार्डचा वापर करण्यात येतो. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ओढावल्यास, त्याच्या आधार कार्डचे काय होते, हे तुम्हाला माहिती आहे का? त्यांच्या आधारच्या मदतीने तुम्हाला सवलती सुरु ठेवता येतात का?
मयताच्या आधारचे काय करावे?
UIDAI प्रत्येक भारतीय नागरिकाला आधार कार्ड देण्यात येते. आता तर जन्मलेल्या बाळाचे सुद्धा आधार कार्ड तयार करता येते. आधार कार्ड देण्याची व्यवस्था युआयडीएआयने केली आहे. पण आधार कार्ड रद्द करण्याची अथवा मयत व्यक्तीचे आधार कार्ड सरेंडर करण्याची कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे त्याचा गैरवापर होण्याची भीती कायम असते. अनेकदा व्यक्ती मयत झाल्यानंतर सुद्धा काही जण त्याचे अनुदान, रेशन लाटतात.
मग उपाय तरी काय
आधार कार्ड सरेंडर अथवा ते रद्द करता येत नाही. पण ते लॉक करता येते. लॉक केल्यानंतर दुसरी व्यक्ती आधार कार्डचा डेटा एक्सेस करु शकत नाही. त्यासाठी आधार कार्ड अगोदर अनलॉक करावे लागेल. तर ज्यांच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्यांनी या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही, यासाठी काळजी घ्यावी.
असे करा आधार कार्ड लॉक