नवी दिल्ली : ‘एक बंगला बने न्यारा’ म्हणत आपण घर (Home) बांधतो. खरेदी करतो. अपार्टमेंटमध्ये (Apartment) 1, 2, 3, 4 बीएचके सदनिका खरेदी करतो. चार भिंती, एक छत आणि आत प्रेमळ माणसं असं काहीसं आपलं कॅलक्युलेशन असतं. पण परिस्थिती सांगून येते थोडीच. कधी कधी ईएमआय (EMI) भरल्या जात नाही, अशावेळी खरंच जप्त होते का?
जर तुम्ही काही कारणांमुळे तीन EMI चुकते करण्यास चुकलात तर या चुकीबद्दल काय काय चुकतं करावं लागतं ते आपण पाहुयात. बाब स्पष्ट आहे. चूक केली तर त्याचे परिणाम भोगावे लागतात.
कोणतेही कर्ज घेताना, तज्ज्ञ त्यामुळेच सहा ते सात महिन्यांच्या ईएमआयची आगाऊ तरतुदीचा सल्ला देतात. हा सल्ला फार मोलाचा असल्याचे आपल्याला ईएमआयचा हप्ता चुकल्यावर लक्षात येते.
EMI जमा न केल्यास तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो. सलग तीन ईएमआय न जमा केल्यास बँक तुम्हाला डिफॉल्टरच्या यादीत टाकू शकते. तुमचा क्रेडिट स्कोअर बिघडू शकतो.
पहिल्यांदाच EMI चुकला तर बँक तुम्हाला एक हप्ता जमा करण्याविषयी एसएमएस आणि ईमेल द्वारे आठवण करुन देईल. सोबतच बँक थेट पेमेंट करण्यासंदर्भातील लिंक शेअर करेल. त्यावर क्लिक करताच तुम्हाला हप्ता भरणे सोयीचं होईल. विलंब शुल्क म्हणून बँक तुमच्याकडून 1-2% टक्के जादा रक्कम घेईल.
दुसऱ्यांदा चूक झाल्यास बँक तुम्हाला ईएमआय न जमा केल्याबद्दल चेतावणी देईल. हा इशारा तुमच्या हलगर्जीपणाबद्दल असेल. बँकेतून तुम्हाला कॉल सुद्धा येईल. तुम्हाला वेळेवर हप्ता जमा करण्याचा सल्ला देण्यात येईल. दुसऱ्यांदा हप्ता चुकवल्याचे बँक तुम्हाला सांगेल. त्यामुळे तुम्ही त्वरीत EMI भरणे आवश्यक राहिल.
आता तिसऱ्यांदाही तुम्ही वेळेवर हप्ता जमा नाही केला तर बँक ही गोष्ट सहज सोडू देणार नाही. पूर्वी तुमचा हलगर्जीपणा समजण्यात येत होता. पण आता ही तुम्ही जाणूनबुजून चूक करत असल्याचे दिसून येईल. बँक तुम्हाला इशारा देईल. लवकरात लवकर ईएमआय जमा करण्यास सांगण्यात येईल.
त्यानंतरही तुम्ही 90 दिवस वा तीन महिन्यात ईएमआय जमा केला नाही तर तुमच्या घराच्या जप्तीची कारवाई सुरु करण्यात येईल. घराच्या लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. त्यापूर्वी तुम्हाला बँक नोटीस पाठवेल.
जर तुम्ही सलग तीन ईएमआय भरताना चूक केली. बँकेने आठवण करुन दिल्यानंतरही पु्ढील 90 दिवसांच्या आत हप्ता जमा केला नाही तर त्याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होईल. तुम्हाला डिफॉल्टर म्हणून घोषीत करण्यात येईल. भविष्यात कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देणार नाही.