कामाची बातमी! तुमचे बँकेत जास्तीत जास्त किती अकाऊंट असले पाहिजे?, …अन्यथा येऊ शकते पश्चतापाची वेळ

| Updated on: Jan 12, 2025 | 3:48 PM

अनेकांचे बँकेमध्ये एकापेक्षा अधिक खाती असतात. त्यामुळे अनेकांना मोठा फटका देखील बसतो. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत की बँकेत जास्तीत जास्त किती खाती असावीत.

कामाची बातमी! तुमचे बँकेत जास्तीत जास्त किती अकाऊंट असले पाहिजे?, ...अन्यथा येऊ शकते पश्चतापाची वेळ
Follow us on

आता सर्वच आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन झाले आहेत. नोटबंदीपासून तर ऑनलाईन व्यवाहाराला अधिक प्राधन्य दिलं जात आहे. या सर्वांमध्ये बँकेची भूमिका देखील महत्त्वाची आहे. आपल्या सॅलरीपासून ते कर्जापर्यंत सर्व व्यवाहार हे बँकेच्या माध्यमातून पार पडत असतात. एवढंच काय आपण जी काही बचत करतो, ती देखील आपण बँकेत जमा करतो. बँकेच्या विविध योजनांमध्ये आपण पैसे गुंतवतो. मात्र अनेकांचे बँकेमध्ये एकापेक्षा अधिक अकाउंट असतात. जर तुमचेही बँकेत अनेक खाते असतील तर तुम्हाला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत की बँकेमध्ये एका व्यक्तीचे जास्तीत जास्त किती खाते असावेत?

अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार एक व्यक्तीचे बँकेत जास्तीत जास्त तीन खाते असावेत. पहिलं खात जे असेल ते तुमचं सॅलरी खातं असेल. या खात्यामध्ये तुमची सॅलरी जमा होईल. तुम्हाला तुमच्या कंपनीकडून अथवा ऑफीसमधून मिळणारे पैसे हे या खात्यात जमा होतील.

दुसरं खात जे आहे ते फक्त तुम्ही ईएमआयसाठी ठेवा. म्हणजे तुम्ही अनेकदा घर खरेदीसाठी लोन घेतलं असेल, पसर्नल लोन घेतलं असेल, किंवा वाहन खरेदीसाठी लोन घेतलं असेल तर सॅलरी अकाउंटमधील पैसे तुम्ही या खात्यात ट्रान्सफर करू शकता, ज्यामधून तुमचे ईएमआय आपोआप कट होतील. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.

तीसरं खातं जे आहे, ते खात तुम्ही तुमच्या सॅलरीमधून महिन्याकाठी जी बचत करणार आहात त्यासाठी वापरू शकता. म्हणजे तुम्ही जे सेव्हिंग करता, ते पैसे तुम्ही या खात्यात ठेवू शकता.  त्यामुळे तुमचा गोंधळ होणार नाही.

जास्त खाते असल्यास काय होऊ शकतं? 

अनेकदा जर बँकेत तुमचे तीन पेक्षा जास्त खाते असतील तर त्यातील काही खाते हे निष्क्रिय होतात, म्हणजे तुम्ही प्रत्येक खात्यामधून व्यवहार करतालच असं नाही. ज्या खात्यामध्ये तुम्ही मिनिमम बॅलन्स ठेवू शकत नाही, त्या बँका तुमच्याकडून अशा परिस्थितीमध्ये दंड आकरतात. जर तो दंड तुम्ही भरला नाही तर तुम्हाला आयटीआर भरण्यास देखील समस्या येऊ शकते.