Voter ID Recover : मतदान ओळखपत्र हा तुमचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठीचा गेट पास (Gate Pass) आहे. ओळखपत्र असेल तर तुम्हाला मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येईल. तुमच्या आवडत्या पक्षाच्या उमेदवाराला (Candidate) मतदान करता येईल. एवढंच नव्हे तर एकही उमेदवार तुमच्या पसंतीस उतरला नसेल तर तुम्हाला नोटाचा पर्याय (NOTA Option) ही वापरता येते. पण एखाद्यावेळी हा गेटपासच जर हरवला तर ? अथवा तुमचे मतदान ओळखपत्रच फाटले, गहाळ झाले अथवा अशा ठिकाणी तुम्ही ते ठेवले की त्याचा तुम्हाला विसर पडला. अशावेळी काय करावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ओळखपत्र परत कसे मिळवावे हा प्रश्न समोर उभा राहतो. मतदान ओळखपत्राशिवाय तुम्हाला काही महत्वाची कामे पूर्ण करता येत नाहीत. पण निराश होऊ नका, तुम्हाला तुमचे ओळखपत्र कसे मिळवावे हे आता आम्ही सांगणार आहोत. पद्धत अत्यंत सोपी आहे. त्याद्वारे तुम्हाला तुमचे मतदान ओळखपत्र (Voter ID) परत मिळवता येईल.
मतदान ओळखपत्र परत मिळवण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरला जावे लागेल. वोटर हेल्पलाईन अप्लिकेशन डाऊनलोड (Download Voter Helpline App) करावे लागेल. हे अप्लिकेशन निवडणूक आयोगाचे अधिकृत अॅप आहे. त्याचा वापर मतदाराला नोंदणी आणि निवडणुकीसंबंधीच्या प्रक्रियेसाठी वापरता येईल. जर नागरिकाला त्याचे वोटर आईडी बदलायचे असेल तर त्याला अॅपची मदत घेता येते. या अॅपच्या माध्यमातून त्याला निवडणूक ओळखपत्र मिळू शकते.