Whatsapp New Update: व्हॉट्सॲपमध्ये येत आहे एक नवीन अपडेट, कॅमेरासाठी असेल शॉर्टकट बटण

| Updated on: Aug 27, 2022 | 5:23 PM

WABetaInfo ने व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरची माहिती दिली आहे. नवीन वैशिष्ट्य Android च्या बीटा आवृत्ती 2.22.19.7 वर देखील वापरले जाऊ शकते. नवीन बीटा आवृत्ती Google Play Store वर अपडेट करण्यात आली आहे, जिथून बीटा वापरकर्ते ते डाउनलोड करू शकतात.

Whatsapp New Update: व्हॉट्सॲपमध्ये येत आहे एक नवीन अपडेट, कॅमेरासाठी असेल शॉर्टकट बटण
नवीन फिचर
Image Credit source: Social Media
Follow us on

Whatsapp New Update: संभाषणासाठी व्हॉट्सॲप हे कॉलिंग इतकेच महत्त्वाचे फिचर झालेले आहे. अनेकदा कॉलिंगपेक्षा जास्त वापर हा व्हॉट्सॲपचा होतो. अनेक वेळा व्हॉट्सॲपमध्ये आपण थेट कॅमेऱ्यातूनही सेल्फी फोटो किंवा व्हिडिओ एखाद्यासोबत शेअर करतो. साधारणपणे कॅमेराचा शॉर्टकट बार आपल्याला खालच्या बाजूला मिळतो.  आता कंपनी त्यात मोठा बदल करण्याची तयारी करत आहे. WhatsApp लवकरच मुख्य ॲपच्या इंटरफेसमध्ये कॅमेरा शॉर्टकट सादर करण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सॲपच्या नवीन अपडेटनंतर अँड्रॉईड फोनमधील कॅमेऱ्याचा शॉर्टकट सर्वात वरच्या सर्च बारवर मिळेल. सध्या कंपनी याचे ट्रायल घेत आहे.  याशिवाय व्हॉट्सॲप एका कम्युनिटी फीचरवरही काम करत आहे. याशिवाय, व्हॉट्सॲप आणखी एका नवीन फीचरवर काम करत आहे, जे आल्यानंतर चॅट लिस्टमधूनच एखाद्याचे स्टेटस पाहता येईल.

WABetaInfo ने व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरची माहिती दिली आहे. नवीन वैशिष्ट्य Android च्या बीटा व्हर्जन 2.22.19.7 वर देखील वापरले जाऊ शकते. नवीन बीटा व्हर्जन Google Play Store वर अपडेट करण्यात आली आहे, जिथून बीटा युजर्स  ते डाउनलोड करू शकतात.  एका नवीन अहवालानुसार, व्हॉट्सॲप एका फीचरवर काम करत आहे ज्यानंतर व्ह्यू वन्स किंवा डिसपिअरिंग मेसेजचे स्क्रीनशॉट घेणे शक्य होणार नाही.

आणखी एक नवीन फीचर सध्या टेस्टिंग मोडमध्ये आहे, त्यानंतर यूजर्सना कॉन्टॅक्टच्या चॅटवर टॅप करून यूजर्सची स्टेटस पाहण्याची सुविधा मिळेल. म्हणजेच, इतर युजर्सचे स्टेटस चॅट बॉक्सच्या प्रोफाइलमध्येच पॉपअप होईल आणि युजर येथून ते  टॅप करून पाहू शकेल. व्हॉट्सॲपचे हे फीचर इंस्टाग्रामच्या फीचरप्रमाणे काम करते, ज्यामध्ये चॅट लिस्टमधूनच स्टोरी पाहता येणे शक्य आहे.

हे सुद्धा वाचा