नवी दिल्ली : डिजिटल युगात स्मार्टफोनचा (SmartPhone) वापर करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. प्रत्येकाकडे स्मार्टफोन आढळतो. त्यात सोशल मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा (WhatsApp) वापर हमखास करण्यात येतो. पण आता चॅटिंग व्यतिरिक्त तुम्हाला व्हॉट्सअॅप इतरही सेवा देत आहे. तुम्ही व्हॉट्सअॅपवरुन पैसे पाठवू शकता. तर तुमच्या बँकेच्या खात्यात किती रक्कम शिल्लक (Bank Balance) आहे, त्याची माहिती ही एका मिनिटात घेऊ शकता. तुमच्या बँकेशी संबंधित मोबाईल क्रमांक तुम्हाला सेव्ह करावा लागतो. हा क्रमांक एखादा सेव्ह झाला की, बँकेकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन (Register Mobile Number) तुम्हाला पुढील प्रक्रिया पूर्ण करता येते.
व्हॉट्सअॅपने युझर्ससाठी मॅसेजिंग सेवेव्यतिरिक्त इतर सेवाही सुरु केल्या आहेत. त्यात व्हॉट्सअॅपवरुन युपीआयद्वारे पेमेंट करण्याची सुविधा मिळते. याद्वारे तुम्हाला बँक खात्यातून दुसऱ्याच्या बँक खात्यात युपीआयच्या मदतीने रक्कम हस्तांतरीत करता येते. एवढेच नाही तर खात्यातील शिल्लक रक्कमेची माहिती मिळते.
व्हॉट्सअॅपवरुन या सेवांचा लाभ घेण्यासाठी ही सेवा सक्रिय करावी लागते. ही सेवा अॅक्टिव्ह केल्यावर तुम्हाला पुढील लाभ घेता येतात. युपीआयद्वारे पेमेंट हस्तातरण आणि शिल्लक रक्कमेची माहिती जाणून घेण्यासाठी सेवा सक्रिय करावी लागते.
व्हॉट्सअॅप पेमेंट्स युपीआयवर आधारीत इतर पेमेंट अॅप्सप्रमाणेच काम करते. तुमच्या मोबाईल फोनमध्ये व्हॉट्सअपॅ पेमेंट्स सुरु करण्यासाठी व्हॉट्सअॅप ओपन करा. सर्वाच वरच्या बाजुला असलेले तीन डॉट्स दिसतील. त्याला क्लिक करा. त्यानंतर पेमेंट हा पर्याय निवडा.
पेमेंटचा पर्याय निवडल्यानंतर ‘Add Payment Method’ वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या बँकेचा मोबाईल क्रमांक व्हेरिफाय करा. आता तुमच्यापुढे बँकांची यादी येईल. यामध्ये तुमचे बँक खाते निवडा आणि ‘Done’ वर क्लिक करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रजिस्ट्रेशन पूर्ण होते.
व्हॉट्सअॅपद्वारे तुमच्या बँक खात्यातील सध्याची रक्कम तपासण्यासाठी व्हॉट्सअॅप उघडा. सेटिंग्समध्ये जाऊन पुढील पर्यायावर क्लिक करा. याठिकाणी पेमेंट आणि बँक खाते यावर क्लिक करा. त्यानंतर बॅलेन्स हा पर्याय निवडा. तुमचा युपीआय पिन टाका. लागलीच तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कमेची माहिती हजर होईल.
व्हॉट्सअप तुमच्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावरुन पेमेंटची सुविधा देते. प्रायमरी बँक सेटअप करताना अटी आणि शर्तींचे पालन करावे लागते. त्यासंबंधीचा पर्याय स्वीकारावा लागतो. सुरक्षिततेसाठी नेहमी नवीनत्तम व्हर्जनचा वापर करा. त्यामुळे फसवणुकीच्या जाळ्यात तुम्ही अडकणार नाहीत.