IT Refund : नाही आला ITR Refund? करदाते हैराण, ही तर कारणं नाहीत

| Updated on: Sep 03, 2023 | 8:41 AM

IT Refund : आयटीआर रिफंड का जमा झाला नाही, यामुळे अनेक करदाते सध्या हैराण आहेत. त्यांनी अनेकदा खाते चेक केले. आयकर खात्याने याविषयी काही अपडेट दिले की नाही, याचा तपास पण घेतला. मग नेमकं काय कारण असू शकतं बरं..

IT Refund : नाही आला ITR Refund? करदाते हैराण, ही तर कारणं नाहीत
Follow us on

नवी दिल्ली | 3 सप्टेंबर 2023 : करादात्यांसाठी आयकर रिटर्न (ITR) जमा करण्याची, फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती. अनेक करदात्यांनी या वेळेच्या आत आयटीआर दाखल केले आहे. उत्तर भारतासह अनेक भागात पुराचा फटका बसला असतानाही आयटीआर वेळेत दाखल करण्यात आले. आता एका महिन्यानंतर करदात्यांना (Taxpayers) रिफंडची प्रतिक्षा आहे. काही करदात्यांच्या खात्यात आयटीआर रिफंड जमा झाला आहे. तर अनेकांना अजूनही रिफंडची प्रतिक्षा आहे. सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यावरही कोणत्या कारणाने आयटीआर रिफंड मिळाला नाही, असा सवाल त्यांना पडला आहे. तज्ज्ञांच्या मते, काही कारणं असू शकतात, ज्यामुळे आयटीआर रिफंड (ITR Refund) मिळण्यास विलंब होत आहे. अथवा एखाद्या त्रुटी, तांत्रिक अडचणीचा परिणाम पण असू शकतो.

ही असू शकतात कारणे

ITR दाखल करण्याची प्रक्रिया

हे सुद्धा वाचा

जर आयटीआर फाईलिंग सध्या प्रक्रियेत असेल तर रिफंड उशीरा मिळेल. आयकर विभागानुसार आयटीआर प्रक्रियेसाठी काही दिवस लागतात.आयटीआर दाखल करुन जास्त दिवस उलटले असतील आणि तरीही रिफंड आला नसेल तर, आयकर खात्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन रिफंडची स्थिती जाणून घ्या.

आयटीआर रिफंडची पात्रता

आयटीआर रिफंड मिळण्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही, हे पण तपासा. आयटीआर रिटर्न रिफंड तेव्हाच होईल, जेव्हा तुम्ही त्यासाठी पात्र असाल. त्याशिवाय प्राप्तिकर खाते याविषयीची प्रक्रिया करणार नाही. आयकर विभागानुसार, साधारणपणे चार आठवड्यात रिफंड मिळतो.

चुकीचे बँक खाते

रिटर्न दाखल करताना चुकीचे खाते जोडल्यास अडचण येऊ शकते. आयटीआर रिफंड करताना चुकीचा बँकिंग तपशील अडचणीत आणू शकतो. तुमच्या खात्यात रिफंड जमा होणार नाही. बँक खात्यावरील नाव आणि पॅन कार्डचा तपशील यांचा मेळ झाला पाहिजे. रिफंड त्याच बँक खात्यात जमा होईल, ज्याचा उल्लेख आयटीआरमध्ये करण्यात आला .

ई-पडताळणी

आयटीआर फाईलिंगची ई-पडताळणी केल्यानंतर आयटीआर रिफंड देण्यात येतो. आयटीआर दाखल केल्या नंतर आणि रिफंड प्राप्त करण्याच्या प्रक्रियेतील ही एक महत्वाची प्रक्रिया आहे. सर्व करदात्यांना त्यांचे आयटीआर दाखल केल्याच्या 30 दिवसांच्या आत ई-पडताळणी, ई-व्हेरिफिकेशन करावे लागते.

तांत्रिक अडचण

एखाद्यावेळी काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रिफंड मिळण्यास उशीर होऊ शकते. संकेतस्थळावरील काही तांत्रिक अडचणींचा फटका बसू शकतो. तुम्ही आयकर विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क साधल्यास याविषयीची तांत्रिक बाब समोर येईल.