Bonus : देशातील 11 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची (Central Government) दिवाळी जबरदस्त राहणार आहे. कारण त्यांना केंद्र सरकारकडून दिवाळीला बंपर गिफ्ट (Diwali Bumper Gift) मिळणार आहे. बुधवारी या निर्णयाचा फैसला होणार आहे. केंद्र सरकार या कर्मचाऱ्यांना नाराज करणार नाही.
देशातील रेल्वे कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार बोनस देण्याचा निर्णय घेऊ शकते. कॅबिनेट बैठकीत हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. Non Gazette कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. देशातील 11 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल.
केंद्र सरकारने बोनस देण्याचा निर्णय घेतला तर सरकारी तिजोरीवर त्याचा भार पडणार आहे. केंद्र सरकारसाठी हा निर्णय आर्थिक खर्च वाढवणारा ठरणार आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 200 कोटींचा भार पडेल.
येत्या दसऱ्यापूर्वी सरकार हा निर्णय घेऊ शकते. रेल्वे बोर्डाने बोनसचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. आतापर्यंतचा विचार करता, केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दसऱ्यापूर्वीच बोनसची घोषणा करण्याचा निर्णय राबविला आहे. त्यामुळे यावेळीही केंद्र सरकार रेल्वे कर्मचाऱ्यांना नाराज करणार नाहीत, अशी कर्मचाऱ्यांना आशा आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे. त्याचा फटका निश्चितच बसणार आहे. सरकारला कोट्यवधीचा भूर्दंड पडणार आहे. या योजनेसाठी कमीत कमी 7000 रुपये प्रतिमाह वेतन असणारे कर्मचारी पात्र आहेत. त्यांच्यासाठी 78 दिवसांची बोनसची अधिकत्तम मर्यादा 17,951 रुपये आहे.
रेल्वेने गेल्या वर्षी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा बोनस दिला होता. एका कर्मचाऱ्याला 30 दिवसांच्या हिशोबाने 7000 रुपये बोनसचे होतील. 78 दिवसांसाठी कर्मचाऱ्यांना 18000 रुपये बोनस मिळेल.