नवी दिल्ली | 21 जुलै 2023 : इनकम टॅक्स रिटर्न फाईल (Income Tax Return) करण्यासाठी केवळ 10 दिवस उरले आहेत. 31 जुलैनंतर तुम्ही आयटीआर (ITR) फाईल कराल तर तुम्हाला दंड भरावे लागेल. विलंब शुल्कासह आयटीआर भरावा लागेल. अनेक जण घरबसल्या स्वतःच ऑनलाईन प्राप्तिकर रिटर्न फाईल करतात. ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन तुम्ही आयटीआर फाईल करत आहात, तो कोणतेही सेवा शुल्क (Charges) तर आकारात नाही ना? याची खात्री करुन घ्या. कारण आयकर खात्याच्या ई-फाईलिंग वेबसाईटवर कोणतेही शुल्क आकारणी होत नाही. तर काही इतर वेबसाईटवर पण तुम्हाला कवडी ही द्यावी लागत नाही.
मोफत सेवा देणारी संकेतस्थळे
myitreturn या संकेतस्थळानुसार, काही वेबसाईट निःशुल्क सेवा देतात. पण काही करदात्यांकडून ही संकेतस्थळे प्राप्तिकर रिटर्न फाईल करताना शुल्क आकारतात. बेरोजगार, गृहिणी, पेन्शनवर निर्भर विधवा, विद्यार्थी अथवा सेवा निवृत्त व्यक्तींकडून ही संकेतस्थळे कुठले पण शुल्क आकारत नाहीत. पण व्यावसायिक आणि उत्पन्न असणाऱ्या गटाकडून सेवा शुल्क आकारतात.
1000 रुपयांचे अतिरिक्त शुल्क
टैक्सस्पेनर या वेबसाईटनुसार, आयटीआर फाईल करताना भांडवली नफा अथवा तोटा यासाठी कोणताही दिलासा दिला जात नाही. या संकेतस्थळाच्या माध्यमातून आयटीआर फाईल करत असाल तर 1000 रुपयांचे अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.
कमी उत्पन्न, मोफत आयटीआर
टॅक्स2विनमध्ये एक खास सोय देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर एक लाख रुपयांच्या आतील उत्पन्नावर करदात्यांना मोफत रिटर्न भरावा लागतो. पण यापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर करदात्यांना आयटीआर फाईल करण्यासाठी शुल्क अदा करावे लागते.
तर 299 रुपये शुल्क
ऑनलाईन इनकम टॅक्स फाईल करण्यासाठी क्लिअर ही वेबसाईट मदत करते. या बेवसाईटने आयटीआर फाईल करण्यासाठी निःशुल्क योजना राबवली नाही. गेल्या वर्षीपासून क्लिअर या बेवसाईटने साध्या आयटीआर फाईलिंगसाठी शुल्क आकारायला सुरु केले आहे. पूर्वी ही सेवा मोफत होती. 151 रुपयांच्या सवलतीनंतर आता वेबसाईट 299 रुपये शुल्क आकारत आहे.
दंड भरावा लागेल
आयटीआर अंतिम मुदतीपूर्वी अथवा अंतिम तारखेला भरणे आवश्यक आहे. नाही तर करदात्याला भूर्दंड बसतो.
करदात्यांना अनेक प्रकारच्या लाभापासून वंचित रहावे लागते. अंतिम मुदतीनंतर आयटीआर भरणाऱ्यांना दंड भरावा लागतो. काही प्रकरणात तुरुंगाची हवा पण खावी लागू शकते. आयटीआर फाईल करण्यासंबंधी प्राप्तिकर खात्याचे नियम आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचा फटका बसतो.