नवी दिल्ली : म्युच्युअल फंड आला की पद्धतशीर गुंतवणूक (SIP ) आपोआप आलीच. म्युच्युअल फंड अल्पावधीतच खूपच लोकप्रिय ठरला. अत्यंत कमी गुंतवणुकीत (Investment) चांगला परतावा मिळत असल्याने अनेकांनी म्युच्युअल फंडचा रस्ता धरला आहे. अल्पबचतीत दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास मोठा फंड तयार होतो. कमी कालावधीत ही अनेक योजना तुम्हाला तगडा रिटर्न देतात. पण त्यात जोखीम (Risk) अधिक आहे. कधी कधी हा जुगार चांगलाच अंगलट येतो. कमाईचं सोडा जी गुंतवणूक केली, तीही हातची जाते. त्यामुळे अधिकत्तम गुंतवणूकदार एसआयपीद्वारे त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, कोणत्याही दिवशी एसआयपी करुन भागत नाही. एसआयपी करताना ती योग्य तारखेला केली तर अधिकचा फायदा मिळू शकतो.
जर नियमीत गुंतवणुकीत एका निश्चित तारखेला रक्कम गुंतवाल, तर त्याचा फायदा अधिक मिळतो. तुम्ही 1, 5, 10 वा 30 या तारखेला गुंतवणूक केल्यास आणि त्याच नियमीत तारखेला रक्कम गुंतवल्यास तुम्हाला फायदा मिळतो का? कोणती तारीख तुमच्यासाठी लकी ठरते. या तारखेचा आणि रिटर्नचा परस्परांशी काही संबंध आहे का, असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांना पडतात. त्याविषयीचा पडताळा जाणून घेऊयात.
ईटी म्युच्युअलच्या अहवालानुसार, गुंतवणूकदारांनी कोणत्या तारखेला गुंतवणूक केली. त्याआधारे त्याला किती फायदा झाला, हे आकडेवारीवरुन समोर आले आहे. त्यासाठी 1 फेब्रुवारी 2013 ते 1 फेब्रवारी 2023 हा 10 वर्षांचा कालावधी घेण्यात आला. यातून 1 ते 28 या तारखेदरम्यान एकसारख्या गुंतवणुकीवर किती लाभ मिळाला हे समोर येते. या अभ्यासासाठी आदित्य बिर्ला सन लाईफ फ्रंटलाईन इक्विटी फंड हा दीर्घकालीन लार्ज कॅफ फंड आणि बेंचमार्क निफ्टी 100-टीआरआय या फंडाची निवड करण्यात आली. जास्तीत जास्त दीर्घकालीन फंडावर विश्वास व्यक्त करण्यात आल्याने अभ्यासासाठी हा फंड निवडण्यात आला.
या आकड्यांचे विश्लेषण करण्यात आले. त्याआधारे ठोकताळे आणि निरीक्षण मांडण्यात आली. या आकड्यांनुसार, जर एसआयपीत महिन्याच्या 1 ते 5 या कालावधीत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला सरासरी 12.10 टक्क्यांचा लाभ झाला. तर बेंचमार्क एसआयपीतही मोठा फायदा झालेला नाही. सरासरी 12.80 टक्के परतावा मिळाला आहे.
12 ते16 या तारखेदरम्यान एसआयपीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सरासरी 12.12 टक्के तर बेंचमार्क एसआयपीतून गुंतवणूकदारांना 12.82 टक्के लाभ मिळाला आहे. अहवालानुसार, महिन्याच्या शेवटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास 12.17 टक्क्यांचा परतावा तर बेंचमार्क एसआयपीत सरासरी 12.87 टक्क्यांचा लाभ मिळाला आहे.
आंकड्यावरुन हे स्पष्ट झाले आहे की, एसआयपीवर मिळणाऱ्या लाभांमध्ये तारखेनुसार फारसा मोठा फरक पडलेला नाही. साधारणतः 12.07 ते 12.09 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. तर बेंचमार्क योजनांमध्ये पण सरासरी परताव्याचा आकडा 12.78-12.89 यादरम्यानच आहे. म्हणजे तुम्ही यापैकी कोणत्याही एका फंडात गुंतवणूक केली असती तर दरमहा 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 10 वर्षांत तुमची रक्कम 22.40 लाख ते 22.62 लाख रुपये झाली असती. तर बेंचमार्क फंडातून 23.25-23.48 लाख रुपये परतावा मिळाला असता.