नवी दिल्ली : जगभरात डिजिटल पेमेंटचे प्रचलन वाढत आहे. विविध डेबिट कार्ड (Debit Card) आणि क्रेडिट कार्डची (Credit Card) बाजारात रेलचेल आहे. लोक त्यांच्या गरजेनुसार, नाहीतर बँक खाते उघडताना देईल ते कार्ड बाजारात त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरतात. बँकेत खाते उघडल्याबरोबर ग्राहकांना डेबिट कार्ड देण्यात येते. डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये अनेक प्रकार आहे, तुमच्या गरजेनुसार, ते निवडू शकता. क्रेडिट वा डेबिट कार्ड घेताना कोणता पर्याय निवडायचा हे ग्राहकाला निश्चित करता येते. त्यानुसार, तुम्हाला फायदा मिळतो. स्वदेशी पेमेंट नेटवर्क रुपे कार्ड (RuPay Card) पण ग्राहकांना 3 प्रकारचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड देते.
Visa Card चे वेगवेगळे प्रकार
जगात सर्वात जास्त पेमेंट नेटवर्क व्हिसा आहे. बँकेसोबत व्हिसा भागीदारीत अनेक कार्ड जारी करते.
मास्टरकार्ड
पेमेंट नेटवर्क मास्टरकार्डचे (MasterCard) तीन प्रकारचे डेबिट कार्ड एकदम लोकप्रिय आहे. हे तीन डेबिट कार्ड आहेत. Standard Debit Card, Enhanced Debit Card आणि World Debit MasterCard. तुम्ही बँकेत खाते उघडल्यानंतर बँकेकडून तुम्हाला स्टँडर्ड डेबिट कार्ड देण्यात येते.
तीन प्रकारचे RuPay Card
स्वदेशी पेमेंट नेटवर्क रुपे कार्ड (RuPay Card) पण ग्राहकांना 3 प्रकारचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड देते. यामध्ये Classic, Platinum आणि Select Card चा समावेश आहे.