नवी दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian Railway) जगातील चौथे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतीय रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. श्रीमंत असो वा गरीब, दूरच्या प्रवासासाठी भारतीय पहिली पसंती रेल्वेलाच देतात. ट्रेनचा प्रवास आरामदायक तर असतोच. पण बस, ट्रॅव्हल्स आणि विमान प्रवासापेक्षा स्वस्त असतो. तुम्ही ही कधी ना कधी रेल्वेतून प्रवास केलाच असेल. रेल्वे प्रवासादरम्यान तुम्ही विविध रंगाचे रेल्वेचे डब्बे (Train Coaches Colour) पाहिले असतील. या रंगीत डब्ब्यांनी तुमचे लक्ष वेधले असेल. या डब्ब्यांना, कोचना असा रंग देण्यामागे काही कारण तर नक्कीच असेल? केवळ डब्बे आकर्षक दिसण्यासाठी तर असा प्रयोग करण्यात आला नसेल का? यामागचे कारण तरी काय आहे.
खरेतर ट्रेनच्या डब्ब्यांचा रंग आणि डिझाईन वेगवेगळे असते. या रंग आणि डिझाईन मागे काही कारणं असतात. रेल्वेत वेगवेगळ्या रंगाचे डब्बे विविध श्रेणींसाठी वापर करण्यात येतो. तर डब्ब्यांचा रंग ट्रेनचा वेगही सांगतो. ट्रेनचा स्पीड काय असेल हे या रंगावरुन कळते. वेगळ्या रंगांमुळे रेल्वेची ओळख पटते. लाल रंगाचा कोच हा शताब्दी आणि राजधानी या ट्रेनला असतो. रंगापेक्षा या रेल्वे कोचचा दर्जा महत्वाचा असतो.
शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस रेल्वेला मुख्यता लाल रंगाचा कोच लावण्यात येतो. हे डब्बे अॅल्युमिनियमने तयार करण्यात येतात. त्यामुळे ते वजनाने हलके असतात. त्यामुळेच या हाय स्पीड ट्रेनेला हे डब्बे जोडण्यात येतात. हे डब्बे जर्मनीहून आयात करण्यात आले आहे. त्यामुळेच हे कोच 160 ते 200 किमी प्रती तासाने धावते. डिस्क ब्रेक असल्याने अचानक रेल्वे थांबविता येते.
भारतीय रेल्वेत (Indian Railways) सर्वाधिक निळे डब्बे दिसून येतात. या डब्ब्यांना इंटिग्रल कोच असे म्हणतात. हे डब्बे एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेनला जोडण्यात येतात. हे लोखंडाने बनविण्यात येतात. जास्त वजन असल्याने या रेल्वे केवळ 70 ते 140 किमी प्रति तासाने धावतात. या रेल्वे थांबविण्यासाठी एअरब्रेकचा वापर होतो.
हिरव्या रंगाचा वापर गरीबरथ रेल्वेसाठी करण्यात येतो. रेल्वेत विविधता यावी, यासाठी रेल्वेने हे रंग वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या हिरव्या रंगावर अनेक प्रकारचे चित्र काढण्यात येतात. त्यामुळे हे कोच सुंदर आणि मन मोहून टाकतात. तर फिकट रंगाच्या रेल्वे या मीटर गेजवर धावणाऱ्या असतात.