नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय जीवन महामंडळाच्या (LIC) अनेक योजना लोकप्रिय आहेत. या योजनांमध्ये ग्राहकांना मोठा परतावा मिळतो. पारंपारिक गुंतवणूकदारांना या योजना लॉटरीपेक्षा कमी नाहीत. एलआयसीच्या या योजनांमध्ये कोणतीही जोखीम नसल्याने ग्राहक यामध्ये रक्कम गुंतवतात. जीवन आनंद पॉलिसी (Jeevan Anand Policy) ही अशीच एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेत तुम्हाला केवळ 2500 रुपयांचा मासिक हप्ता जमा करुन अनेक फायदे मिळविता येतात. या योजनेत गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळतो. त्यामुळे ग्राहक जोखीम मुक्त गुंतवणूक म्हणून एलआयसीमध्ये रक्कम गुंतवतात.
या योजनेमध्ये तुम्हाला सुरक्षेसह परताव्याची हमी पण मिळते. या योजनेत एक लाख रुपयांच्या समअश्योर्ड घेणे आवश्यक आहे. गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही. तुम्हाला कितीही रक्कम अश्योर्ड करता येते. न्यू जीवन आनंद पॉलिसीचा लॉक इन पीरियड 15 ते 35 वर्ष आहे. ही योजना तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खरेदी करु शकता. या योजनेसाठी तुम्ही वार्षिक, सहामाही अथवा दर महिन्याला प्रीमियम भरावा लागेल.
जर 25 वर्षींच्या व्यक्तीने पाच लाख रुपयांची योजना 12 वर्षांकरीता घेतली तर, 27010 रुपयांचे वार्षिक प्रीमियम 21 हप्त्यात जमा करावे लागेल. त्या व्यक्तीची एकूण गुंतवणूक 5.67 लाख रुपये होईल. या योजनेत तुम्हाला बोनस पण मिळते. दर वर्षी ही रक्कम जवळपास 48 रुपये प्रति हजार रुपये मिळते. यामध्ये वेळोवेळी बदल होतो. पण 40 से 48 रुपये प्रति हजार या दरम्यान ही रक्कम मिळते.
या योजनेत तुम्हाला मॅच्युरिटीवर 5 लाख रुपये मिळतील. तुम्हाला त्यासाठी दर महिन्याला 2500 रुपये हप्ता द्यावा लागेल. त्यावर तुम्हाला 22500 रुपये बोनस मिळेल. म्हणजे तुम्हाला संपूर्ण पॉलिसी वर आतापर्यंत 4.5 लाख रुपयांचे बोनस आणि 10 हजार रुपयांचे अतिरिक्त बोनस मिळते. तर 5 लाख रुपये तुम्हाला योजनेच्या मॅच्युरिटीवर मिळेल.
तुम्हाला मॅच्युरिटीवर 5 लाख रुपये तर मिळतीलच. पण सोबतच 4.60 लाखांचा बोनस ही मिळेल. या पॉलिसीची माहिती तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळेल. अथवा तुम्हाला एजंटकडून या योजनेची माहिती मिळेल. ही योजना तुम्ही ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने मिळेल.
एलआयसी धन वर्षा योजना ही एक नॉन-लिंक, वैयक्तिक, बचत आणि एकल प्रीमियम विमा योजना आहे. ही योजना बचतीसोबत चांगला परतावा देते. पॉलिसीधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास या योजनेत वारसदारांना लाभ मिळतो.या योजनेत गुंतवणुकीचे दोन पर्याय उपलब्ध आहेत.या योजनेत वारंवार प्रिमियम भरण्याची कटकटही नाही.