मुंबई : महिला सक्षमीकरणासाठी सरकारने सक्षम पाऊल उचलले आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना (PMMY) सुरु करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत लघुउद्योजकांसाठी (Small Scale Industries) दहा लाखांचा कर्ज पुरवठा करता येतो. विशेष म्हणजे यासाठी एक नवा रुपया पण तारण म्हणून ठेवावा लागत नाही. ना सोने वा चांदीचे दागिने तारण (Morgage) म्हणून ठेवावे लागतात. या योजनेमुळे अनेक महिलांनी स्वयंपुर्ती धडा गिरवला आहे. कुटुंब, समाज आणि देशाला यामाध्यमातून नवउद्योजिका मिळाल्या असून खेळत्या भांडवलामुळे अर्थव्यवस्थेलाही गती मिळाली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला या देशाचा गाडा हाकताना दिसत असल्याचे चित्र विकसीत भारताचे प्रतिक होत आहे. या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत. या योजनेत कोणाला सहभागी होता येते आणि काय लाभ मिळतात याची माहिती घेऊयात.
सिक्युरिटीशिवाय कर्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 रोजी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात केली होती. नॉन-कॉर्पोरेट, नॉन-फॉर्म, लघु/सुक्ष्म उद्योगांसाठी योजनेतंर्गत 10 लाखांपर्यंतचे कर्ज दिल्या जाते. मुद्रा कर्ज 27 सरकारी बँका, 17 खासगी बँका, 31 क्षेत्रीय ग्रामीण बँका, 4 सहकारी बँका, 36 माईक्रो फायनान्स संस्था आणि 25 गैर बँकिंग वित्तीय कंपनीमार्फत दिल्या जाते.
Sometimes just one voice, brave enough to speak up and find the answers can create a wave of change. Presenting Manjha – an ode to those who #SearchForChange ❤️ @TheRajaKumari @swanandkirkire @thehappydance @joyeetad17 pic.twitter.com/cx1z7h5iVm
— Google India (@GoogleIndia) March 7, 2022
महिलांना भरभक्कम आर्थिक मदत
मुद्रा लोन देण्यास सुरुवात झाल्यापासून महिला या योजनेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांना व्यवसाय सुरु करता यावा यासाठी त्यांचे हात बळकट करण्याचा सक्षम पर्याय सरकारने उपलब्ध करुन दिला आहे. या योजनेतंर्गत चार लोकांपैकी कर्ज घेणा-या तीन महिला आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुद्रा योजनेतंर्गत आतापर्यंत 1.62 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. या योजनेमुळे महिलांना वैयक्तिक कर्ज घेण्याची फारशी आवश्यकता राहिली नाही.
या अटींची करा पुर्तता
महिलांना मुद्रा कर्ज योजनेत कर्ज मिळवण्यासाठी काही अटींची पुर्तता करावी लागते. भारतीय नागरिकालाच मुद्रा लोन घेता येते. मुद्रा कर्ज योजनेचा लाभ गैर-कृषि व्यवसायासाठी करावा लागेल. ज्या व्यवसायासाठी कर्ज घेण्यात येत आहे, ती संस्था कॉर्पोरेट नसावी. या योजनेत सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या व्यवसायाची ब्ल्यूप्रिंट तयार हवी.
संबंधित बातम्या :
Share Market | 4 दिवसांत 6% पेक्षा जास्त पडझड! गुंतवणूकदारांचे तब्ब 11.28 लाख कोटी बुडाले
ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेने एफडीचे व्याजदर बदलले, पाहा नवे दर