नवी दिल्ली– वाढत्या पाणी टंचाईच्या काळात केंद्र सरकारनं पाणी प्रक्रिया क्षेत्रावर (Water Treatment Agency) विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. आगामी काळात या क्षेत्रात गुंतवणुकदारांचा कल वाढण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात तेजीची चिन्हे निर्माण होण्याची शक्यता आहे. आघाडीची ब्रोकरेज फर्म यश सिक्युरिटिजने गुंतवणुकदारांना VA Tech Wabag च्या शेअर्ससाठी बाय रेटिंग दिली आहे. यश सिक्युरिटीजने शेअर्समध्ये तेजीचा अंदाज वर्तविला आहे. शेअरची टार्गेट प्राईस 391 रुपये निश्चित केली आहे. आज (मंगळवारी) शेअर 1.76% च्या वाढीसह 248.45 रुपयांवर व्यवहार करत होता. शेअर्सचे टार्गेट प्राईस (Share Target Price) 60 टक्क्यांहून अधिक 391 रुपये आहे. विशेष बाब म्हणजे भारतातील वॉरेन बफेट म्हणून ओळखले जाणारे शेअर बाजारचे दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh jhunjhunwala) यांची कंपनीत सर्वात मोठी गुंतवणूक आहे.
ब्रोकरेजने 30 मे रोजी जारी केलेल्या अहवालानुसार कंपनीला वित्तीय वर्ष FY22 चौथ्या तिमाहीत 3650 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. VA Tech Wabag स्टॉक राकेश झुनझुनवाला यांच्या पसंतीच्या शेअर्सपैकी एक मानला जातो. 31 मार्च 2022 अखेर राकेश झुनझुनवाला यांचा या कंपनीत 8.04 टक्के भागीदारी होती. तसेच या कंपनीत परकीय गुंतवणुकदार आणि म्युच्युअल फंड यांच्याकडे कंपनीची अनुक्रमे 16.17 टक्के आणि 3.41 टक्के भागीदारी आहे.
VA Tech Wabag कंपनीच्या व्यवहारांवर नजर टाकल्यास कंपनीला आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहित 46.07 कोटी रुपयांचा नफा झाला होता. गेल्या वर्षी कंपनीचा नफा 46.53 कोटी रुपयांवर पोहोचला होता. चौथ्या तिमाहित कंपनीचं उत्पन्न 891.86 कोटी रुपये होते. गेल्या वर्षी समान तिमाहित कंपनीचं उत्पन्न 999.25 कोटी रुपये होते.
VA Tech Wabag Ltd. ही चेन्नई मुख्यालय असलेली एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे . वर्ष1924 मध्ये ब्रेस्लाऊ येथे स्थापित कंपनीनं नगरपालिका आणि औद्योगिक वापरकर्त्यांसाठी पाणी प्रक्रियेवर केंद्रित कार्यव्यवहार आहे. आजवर कंपनीने 6000 हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि ती 30 हून अधिक देशांमध्ये कंपनीच्या कार्याचा विस्तार झाला आहे.
टीप : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. शेअर बाजारातील घडामोडींची अद्ययावत माहिती पोहचविणे हा आमचा उद्देश आहे. गुंतवणुक करण्यापूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.