Aadhaar Card : घरबसल्या, आरामात बदलवा आधारचा मोबाईल नंबर, ही आहे प्रक्रिया..

| Updated on: Nov 01, 2022 | 4:55 PM

Aadhaar Card : आधार कार्डचा मोबाईल क्रमांक बदलवायचा आहे? तर ही आहे सोपी पद्धत..

Aadhaar Card : घरबसल्या, आरामात बदलवा आधारचा मोबाईल नंबर, ही आहे प्रक्रिया..
आधार अपडेट सोप्पे
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : आधार कार्डचा (Aadhar Card) मोबाईल क्रमांक (Mobile Number) बदलवायचा असेल तर ही सोप्पी पद्धत (Easy Methods) आहे. त्यासाठी तुम्हाला बाहेर एखाद्या केंद्रावर जाण्याची गरज नाही. ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या अगदी आरामात करु शकता. काही स्टेप्स पूर्ण केल्यावर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक बदलवता येईल.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) प्रत्येक भारतीय नागरिकाला आधार कार्ड देते. सध्या भारतात आधार हे महत्वपूर्ण ओळखपत्र आहे. सध्या याचा सर्वच ठिकाणी वापर होत आहे. ओळख पटवून देण्यासाठी आधार कार्डचा वापर करण्यात येत आहे.

त्यामुळे आधार कार्ड अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. आधार कार्ड अपडेट ठेवण्यासाठी तुम्हाला मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करणे आवश्यक असते. हा मोबाईल क्रमांक बदलवायचा असेल तर तुम्हाला ही प्रक्रिया उपयोगी ठरेल.

हे सुद्धा वाचा

जर तुमचा मोबाईल क्रमांक बदलला असेल तर , या पद्धतीने तुम्हाला मोबाईल क्रमांक अपडेट करता येईल. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही केंद्रात जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही मोबाईल क्रमांक अपडेट करु शकता.

तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या संकेतस्थळाच्या आधारे घरबसल्या आरामानं तुमचा मोबाईल क्रमांक बदलवू शकता. त्यासाठी ही सोपी प्रक्रिया अवलंबवावी लागेल. स्टेप बाय स्टेप ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा. सर्व्हिस रिक्वेस्ट ऑप्शनवर जा. नॉन आयपीपीबी बँकिंग उघडा, त्यात डोअरस्टेप बँकिंगचा पर्याय निवडा. एका अर्जासोबत नवीन पेज उघडेल. त्यामध्ये सविस्तर माहिती भरा. आधार मोबाईल अपडेट हा पर्याय निवडा.

ही सर्व प्रक्रिया झाल्यावर सबमिट बटणावर क्लिक करा. जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज जमा कराल. तेव्हा पोस्टमन तुमच्याशी संपर्क साधेल. आधार कार्डच्या आधारे तुमचे बायोमॅट्रिक्स आणि केवायसी पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट होईल.