नवी दिल्ली : जर तुम्हीही शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला कर्ज घेता येईल. तुम्हाला गरजेच्या वेळी कर्ज (Loan) घेता येईल. शेअरच्या बदल्यात तुम्हाला कर्ज मिळेल. डीमॅट खात्यात (Demat Account) मात्र शेअर असणे आवश्यक आहे.
मिरे अॅसेट ग्रुप की नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीच्या (NBFC) मिरे अॅसेट फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या माध्यमातून ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. हे कर्ज NSDL च्या नोंदणीकृत डीमॅट खातेदारांना मिळू शकेत.
त्यासाठी खातेदारांना MAFS हे मोबाईल अॅप डाऊनलोड करावे लागेल. या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला मिरे अॅसेट फायनान्शिअल सर्व्हिसेस ऑनलाईन कर्ज देईल. विशेष म्हणजे तुम्हाला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरही कर्ज घेण्याची सोय आहे. ही सुविधा कंपनीने पूर्वीपासूनच सुरु केली आहे.
NSDL डीमॅट खातेदारांना इक्विटी गुंतवणुकीवर 10,000 रुपयांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येईल. त्यासाठी शेअर तारण म्हणून ठेवावे लागतील .ग्राहक स्वीकृत इक्विटीच्या यादीतून शेअर तारण ठेऊन कर्ज घेऊ शकता.
हे कर्ज खातेदारांना ओव्हरड्राफ्टच्या रुपात उपलब्ध होईल. ग्राहक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आणि कुठेही, मोबाईल अॅपच्या माध्यमातून ही प्रक्रिया करु शकतात. कर्जाची रक्कम त्यांना झटपट मिळेल.
कर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्या झाल्या, त्याच दिवशी ग्राहकाच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा करण्यात येईल. या कर्जावर 9 टक्क्यांपर्यंत व्याज आकारण्यात येईल.
MAFS मोबाईल अॅपच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज करता येईल. खातेदाराला त्याच्या गरजेनुसार कर्ज मिळेल. पण त्यासाठी डीमॅट खात्यात शेअरची वर्दळ असणे आवश्यक आहे. ग्राहकाला कर्ज रक्कम फेडता येईल.