नवी दिल्ली : आजच्या काळात आधार कार्ड (Aadhaar Card) हा सर्वात महत्वपूर्ण दस्तावेज आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते सिमकार्ड खरेदीपर्यंत अनेक कामांमध्ये आधार कार्डची गरज पडते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड अपडेट करण्याविषयी नागरिकांना सतत जागरुक करत असतात. प्राधिकरण वेळोवेळी त्यासाठी अलर्ट पाठवते. आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी प्राधिकरण नागरिकांना जागरुक करते. आधार कार्डला मोबाईल क्रमांक जोडलेला असतो. यामध्ये नाव आणि पत्ताही असतो.हा पत्ता सतत अपडेट करणे आवश्यक आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मोबाईल क्रमांकाचा वापर होतो. आधार कार्डासंबंधीची माहिती तुम्हाला मोबाईल क्रमांकावरुनच (Mobile Number) मिळते. जर आधार कार्डसोबत तुमचा ई-मेल आयडी (email ID) आणि मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर याविषयीची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळणार नाही. तसेच तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर होत नाही हे तपासणे ही गरजेचे आहे. तरच तुम्हाला याविषयीची शहानिशा करता येईल.
जर तुमच्या मोबाईल क्रमांकावर आधार कार्डसंबंधीची माहिती अथवा ओटीपी (OTP) मिळत नसेल तर यावरील उपाय तुम्हाला तातडीने करणे आवश्यक आहे. आधार कार्डविषयीचा हलगर्जीपणा तुम्हाला भोवले. तुम्ही एखाद्या फसवणुकीचे शिकार होऊ शकता. तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होत असेल तर त्याची शहानिशा करुन तुम्हाला तक्रार दाखल करता येते.
अनेकदा तुम्ही आधार कार्डशी संबंधित मोबाईल क्रमांक अपडेट करता. पण तरीही तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळत नाही. अशा वेळी, ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. जर तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून फसवणूक होत असेल, त्याचा गैरवापर होत असेल तर तुम्ही नाहक संकटात अडकाल. त्यामुळे ओटीपी न मिळाल्यास तातडीने आधार केंद्रावर धाव घ्या.