नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 19 मे 2023 रोजी शुक्रवारी संध्याकाळी अचानक दोन हजार रुपयांची नोट (2000 Rupee Notes) बंद करण्याची घोषणा केली. या गुलाबी नोटा कशा बदलायच्या याविषयी लोकांच्या मनात अजूनही संभ्रम आहे. गेल्या वर्षभरापासून तशाही या नोटा फारशा चलनात नाही. ज्यांच्याकडे या नोटा नाहीत, त्यांना चिंता नाही. या नोटा बदलण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. बँका आणि व्यावसायिक मध्यस्थी केंद्रात तुम्हाला या नोटा बदलता येतील. बँकेचे खाते नसले तरी बँकेत जाऊन या नोटा बदलता येतील. नोटा बदलायच्या नसतील तर खात्यात जमा करता येतील. 30 सप्टेंबर 2023 रोजीपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. तोपर्यंत या नोटा व्यवहारात वैध (Legal Tender) आहेत.
नोटा बदलण्यासाठी भरा हा अर्ज
23 मे 2023 रोजी बँकांमध्ये जाऊन नोटा बदलता येतील. एका दिवशी 2,000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये बदलता येतील. त्यासाठी केवळ रांगेत उभं राहिलं की झालं, असं अजिबात नाही. बँकेत गेल्यावर तुम्हाला एक अर्ज भरुन द्यावा लागेल. हा अर्ज बँकेत उपलब्ध असेल. ग्राहकाला बँकेतच तो भरुन देता येईल. अथवा घरी जाऊन भरुन पुन्हा बँकेत येता येईल.
ही कागदपत्रे आवश्यक
बँकेत 2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी तुमचे मुळ ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल. यामध्ये आधार कार्ड, वाहन परवाना, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, नरेगाकार्ड, पॅनकार्ड अथवा इतर संबंधित ओळखपत्र यापैकी एक सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच त्याची झेरॉक्सही सोबत ठेवावी लागेल.
अर्जात भरा हा तपशील
गैरसमज दूर करा