Share Double Income : हा शेअर करेल मालामाल, जवळपास दुप्पट होईल गुंतवणूक

| Updated on: Feb 18, 2023 | 5:25 PM

Share Double Income : हा शेअर घेणार लवकरच उसळी, तुम्ही होऊ शकता मालामाल, तज्ज्ञांचा सल्ला काय, तुम्ही या शेअरमध्ये गुंतवणूक केली का?

Share Double Income : हा शेअर करेल मालामाल, जवळपास दुप्पट होईल गुंतवणूक
Follow us on

नवी दिल्ली : जर तुम्ही पण शेअर बाजारात (Share Market) नियमीत गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या शेअरमधील गुंतवणूक तुम्हाला मालामाल करु शकते. या कंपनीचा शेअर सातत्याने चर्चेत आहे. तसेच कंपनीही सातत्याने बातम्यांमध्ये आहे. झोमॅटो डिलिव्हरी कंपनी (Zomato Delivery Company) सातत्याने चर्चेत आहे. या कंपनीचा शेअर लवकरच भरारी घेईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सध्या या शेअरची किंमत (Share Price) 51 रुपये आहे. तज्ज्ञांच्या मते, झोमॅटोच्या शेअरची किंमत येत्या काही दिवसांत 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना (Investors) कमाईची मोठी संधी मिळणार आहे.

ब्रोकरेज कंपनी जेईएम फायनान्शियल याविषयीचा अंदाज वर्तविला आहे. फ्री डिलिव्हरीचा नकारात्मक परिणाम काही कालावधीसाठी असेल. तर या कंपनीच्या इतर उत्पन्न, लाभातून तसेच धनसंचयातून परिस्थिती सुधारेल. परंतु, कंपनीचे सध्याचे विविध घटनाक्रम, निर्णय यावरुन वाद सुरु आहे.

याविषयीच्या प्रसिद्धी पत्रकात विश्वास व्यक्त केला आहे की, झोमॅटो लवकरच कमबॅक करेल. या कंपनीच्या ऑर्डरमध्ये वृद्धी दिसून येईल. गोल्ड सदस्यांसाठी मोफत वितरणाचा फायदा ग्राहकांना होईल. तसेच या कंपनीकडे याविषयीचा महसूल आणि खर्चाची तरतूद आहे.

हे सुद्धा वाचा

जेएम फायनान्शियलला झोमॅटो दीर्घ कालावधीसाठी चांगली कामगिरी बजावेल, अशी आशा आहे. दीर्घ कालावधीसाठी हायपर लोकल डिलिव्हरीत मोठ्या वाढीची संभावना व्यक्त करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि पुरेशी गंगाजळी या भरवशावर कंपनी भविष्यातील प्रगतीबाबत आशावादी आहे. उत्पन्न वाढेल, अशी कंपनीला आशा आहे. डिसेंबर 2022 पर्यंत 113 अब्ज रुपयांच्या निव्वळ रोखीने कंपनीचा ताळेबंदही मजबूत आहे.

यापूर्वी शुक्रवारच्या व्यापारी सत्रात झोमॅटोच्या शेअरमध्ये 2.5 टक्क्यांची घसरण दिसून आली. तिमाही निकाल अपेक्षित आले नाही. तिमाहीत कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला. डिसेंबरच्या तिमाहीत झोमॅटोचा घाटा वाढून 346.67 कोटी रुपयांवर पोहचला. गेल्यावर्षी कंपनीचा याच कालावधीतील घाटा 63 कोटी रुपये होता. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या कमाईत 75 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. कंपनीची कमाई 1948 कोटी रुपये झाली. तर गेल्या वर्षी हाच आकडा 1112 कोटी रुपये होता.

टाटा समूहाच्या टेलिकॉम सेक्टरशी संबंधित उपकंपनी तेजस नेटवर्क्सचा (Tejas Networks Ltd) आहे. या कंपनीचा शेअरसह सेंच्युरी टेक्सटाईलच्या (Century Textile and Industries Ltd) शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजी दिसून आली आहे. सेंच्युरी टेक्सटाईलच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली. हा शेअर 647.40 रुपयांच्या आतबाहेर खेळत होता.