समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना, शहापूरजवळ पूलाचा गर्डर कोसळला, 17 जणांचा मृत्यू, 3 जखमी

| Updated on: Aug 02, 2023 | 7:08 AM

विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला अपघात होऊन ती पलटी झाली होती. तर त्या बसला आग लागल्याने त्यात होरळून २५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यानंतर आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर मोठी घटना घडली आहे.

ठाणे, 01 ऑगस्ट 2023 | समृद्धी महामार्गावर (Samrudhi Highway Accident) एका महिन्याच्या आधी मोठी भीषण दुर्घटना झाली होती. त्यात विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला अपघात होऊन ती पलटी झाली होती. तर त्या बसला आग लागल्याने त्यात होरळून २५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यानंतर आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर मोठी घटना घडली आहे. ज्यात शहापूरच्या (Shahapur Accident) सरलांगे गावामध्ये काम सुरू असताना पूलाचा गर्डर कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीरित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय या ठिकाणाखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती वर्तवली जाती आहे. तर एनडीआरएफच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

Published on: Aug 01, 2023 09:59 AM
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त आज पुण्यातील प्रमुख रस्ते बंद; ‘या’ मार्गाने जाणे टाळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर